Hug Day 2022 : फेब्रुवारी महिन्याला प्रेमाचा महिना म्हणतात. व्हॅलेंटाईन वीक सुरु झाला आहे. या आठवड्याच्या प्रत्येक दिवशी काहीतरी खास दिवस असतो. असाच साजरा केला जाणारा एक दिवस म्हणजे 'Hug Day'. दरवर्षी 12 फेब्रुवारी रोजी Hug Day साजरा केला जातो. Hug Day ला खूप महत्त्व आहे आणि तो खूप खास मानला जातो.


प्रेमाने आपल्या आवडत्या व्यक्तीच्या कुशीत सामावून जाणे यासारखे दुसरे सुख नाही. कुणाला मिठी मारणे किंवा कुणाला मिठीत घेण्यानं प्रेम आणि विश्वास वाढतो. तसंही प्रेमानं मिठी मारण्यासाठी कोणत्याही एका विशिष्ट दिवसांची गरज नसते, पण आजचा दिवस खासच आहे. 'Hug Day' च्या निमित्ताने मिठी मारण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घ्या. 


यासाठी जोडीदाराला रोज मिठी मारावी :


जोडीदाराला रोज मिठी मारल्याने तणाव कमी होण्याबरोबरच चिंता देखील कमी होते. जोडीदाराला 20 सेकंद मिठी मारल्याने शरीरात 'हे' बदल दिसून येतात.


तणावाची पातळी कमी करते :


तुमच्या जोडीदाराला मिठी मारणे तणाव कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. तुमचा तणाव कमी झाल्याने तुमचा मूडही छान राहतो. 


रक्तदाब कमी होतो :


तुम्हाला माहित नसेल पण, 10 मिनिटे हात धरण्यापासून ते 20 सेकंद मिठी मारण्यापर्यंत तुमच्या रक्तदाबाची पातळी लक्षणीयरीत्या कमी होते. म्हणूनच मिठी हे रोमँटिक तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी चांगली मानली जाते. 


शरीरातील वेदना कमी होतात :


जर तुम्हाला कुठेतरी वेदना होत असेल तर तुमच्या जोडीदाराला मिठी मारल्याने खूप आराम मिळतो. कारण मिठी मारल्याने तुमच्या शरीरात असे हार्मोन्स तयार होतात, ज्यामुळे वेदना कमी होतात.


भीती कमी होते :


एखाद्याला मिठी मारल्याने तुमची भीतीही खूप कमी होते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha