Happy Promise Day 2022 : दर वर्षी 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) साजरा केला जातो. त्या आधी एक आठवडा व्हॅलेंटाईन विक (Valentines Week)  साजरा केला जातो. आज (10 फेब्रुवारी) 'प्रॉमिस डे' (Promise Day) आहे. 'प्रॉमिस डे' दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनरला काही वचन देऊ शकता. जेव्हा  कपल्स एकमेकांना वचन देतात, तेव्हा ते या वचनाद्वारे त्यांच्या नात्यामधील प्रामाणिकपणा आणि प्रेम दर्शवतात. या 'प्रॉमिस डे' ला तुम्ही हे वचन पार्टनरला देऊ शकता.  


प्रेम कधीच कमी होणार नाही
प्रॉमिस डे' च्या दिवशी, आपले प्रेम कमी होऊ न देण्याचे वचन आपल्या जोडीदारास द्यावे. या वचनामधून तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करू शकता. हे प्रोमिस करताना तुम्ही पार्टनरला गिफ्ट देऊ शकता. 
 
कठिण प्रसंगामध्ये साथ देणार 
आयुष्यामध्ये कधी चांगले प्रसंग येतात तर कधी वाईट पण वाईट प्रसंगांमध्ये साथ देणारे व्यक्ती हे प्रिय असतात, असं म्हणलं जातं. प्रोमिस डे दिवशी तुम्ही पार्टनरला त्यांच्या कठिण काळामध्ये देखील साथ देईल, असे वचन देऊ शकता. 


शांतपणे प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न 
आयुष्यात अनेकदा असा प्रसंग येतो ज्यामध्ये तुम्हाला अनेक प्रश्न पडतात.अशा वेळी राग येणे, वाईट वाटणे या गोष्टी घटतात. पण शांतपणे आपल्या पार्टनरसोबत संवाद साधून ते प्रश्न सोडवले जाऊ शकतात. त्यामुळे हे वचन तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला किंवा पार्टनरला देऊ शकता. 


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha