एक्स्प्लोर

Hair Care Tips : केसगळती टाळण्यासाठी ही' योगासने करा; काही दिवसांतच फरक दिसेल

Hair Care Tips : केसगळतीचा त्रास असलेले लोक काही विशेष योगासने करू शकतात.

Yoga For Control Hairfall : केस गळण्याची (Hair Care Tips) समस्या सामान्य आहे. अनेकांचे केस खूप कमकुवत, पातळ आणि निर्जीव असतात. त्याचबरोबर वयानुसार केसांचा रंगही कमी होऊ लागतो. याचे कारण म्हणजे बिघडलेली जीवनशैली आणि आहारातील पोषणाचा अभाव. केस व्यक्तीचं सौंदर्य खुलवतात. स्त्री आणि पुरुष दोघांनाही काळे आणि दाट केस हवे असतात पण केसांच्या समस्यांमुळे ते त्रस्त असतात.

केसांच्या समस्या कमी करण्यासाठी विविध महागडी केसांचे प्रोडक्ट्स वापरले जातात. केस पांढरे होणे किंवा केसगळती कमी करण्यासाठी काही योगासनं तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही योगासनांची नावं सांगणार आहोत ज्यामुळे तुमची केसगळती कमी होईलच पण तुमचे केसही घनदाट होतील.  

शीर्षासन 

शीर्षासन केल्याने डोक्याकडे होणारा रक्तप्रवाह सुधारतो आणि केसांची वाढ चांगली होते. ज्यांचे केस गळत आहेत, निर्जीव होत आहेत किंवा केस पांढरे होण्याची समस्या आहे त्यांनी शिर्षासन करावे. तणाव कमी करण्यासाठी शिर्षासनाचा सराव करता येतो. हे आसन करण्यासाठी दोन्ही हात डोक्याच्या मागे घेऊन खाली वाकून डोके खाली ठेवा. शरीराचा समतोल राखताना पाय वरच्या बाजूला हलवा. डोक्यावर उभे असताना संतुलन राखा आणि सरळ व्हा.

बालासन

बालासनाच्या सरावाने पोटाशी संबंधित समस्या आणि तणावापासून आराम मिळू शकतो. पोटाच्या समस्या आणि तणावामुळे केस गळतात. त्यामुळे केसांची वाढ आणि घट्ट होण्यासाठी बालासन फायदेशीर ठरू शकते. हे आसन करण्यासाठी गुडघे वाकवून वज्रासनाच्या आसनात बसा. आता आपले हात वरच्या दिशेने हलवत दीर्घ श्वास घ्या. नंतर श्वास सोडताना शरीराला पुढे वाकवा. या स्थितीत डोके जमिनीवर आणि पोट मांड्यांवर ठेवा.

त्रिकोनासन 

केस अकाली पांढरे होत असतील, केसांमध्ये कोरडेपणा जाणवत असेल आणि केस जास्त गळल्यामुळे पातळ दिसत असतील तर त्रिकोणासन करा. हे आसन करण्यासाठी दोन्ही पाय काही अंतरावर ठेवून उभे रहा. आता तुमचे हात आणि खांदे सरळ ठेवून वरच्या दिशेने करा. उजव्या बाजूला वाकून उजव्या हाताने पायाला स्पर्श करा. या दरम्यान, डावा हात  वर करा. दुसऱ्या बाजूने ही प्रक्रिया पुन्हा करा.

उत्तानासन 

उत्तानासनाचा नियमित सराव केल्यास केसांच्या समस्या कमी होतात. हे आसन करण्यासाठी सरळ उभे रहा. आता दीर्घ श्वास घ्या आणि दोन्ही हात वरच्या दिशेने हलवा आणि श्वास सोडा. नंतर हात जमिनीच्या दिशेने खाली करा आणि पायाच्या बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : मनःशांतीसाठी 'या' 4 गोष्टींपासून दूर राहा; स्वतःवर प्रेम असेल तर 'या' गोष्टी कोणत्याही किंमतीत करू नका

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
Makrand Patil : माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य

व्हिडीओ

Rohit Pawar On Ajit pawar : विमान अपघात होत असताना अजित पवार कुठे बसले होते?
Rohit Pawar On Ajit Pawar : अजित पवारांचा घातपात असू शकतो, रोहित पवारांचं मत
Sandip Girhe On Chandrapur Mayor : भाजपसोबत का गेले? राजकीय गणितं कशी जुळली, संदीप गिऱ्हे EXCLUSIVE
Chandrapur Mayor Election 2026 : चंद्रपूरमध्ये भाजप-ठाकरेसेनेची सत्ता स्थापन, महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर विराजमान
Sunetra Pawar Delhi Daura:मुख्यमंत्र्यांपाठोपाठ सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा, अमित शहांची भेट घेणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
Makrand Patil : माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
Sanjay Jadhav : परभणीत काँग्रेससोबत राहील, संजय जाधव यांना विश्वास, अजित पवारांच्या एका फोन कॉलचा संदर्भ देखील सांगितला
परभणीत काँग्रेससोबत निवडणूकपूर्व आघाडी होती,आमचा चांगला समन्वय, काँग्रेस सोबत राहणार: संजय जाधव
Rohit Pawar PC : हा तर शंभर टक्के घातपात, अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे 10 गंभीर प्रश्न
हा तर शंभर टक्के घातपात, अजितदादांच्या अपघातावर रोहित पवारांचे 10 गंभीर प्रश्न
Rohit Pawar: अजित दादा परत येणार नाहीत, रोहित पवारांनी पुराव्यासह वाईट वेळ सांगितली; म्हणाले, दोन दिवस आधी विमानाची सूरतवारी
अजित दादा परत येणार नाहीत, रोहित पवारांनी पुराव्यासह वाईट वेळ सांगितली; म्हणाले, दोन दिवस आधी विमानाची सूरतवारी
Embed widget