Hair care tips: काळेभोर आणि चमकदार केस हवेत? घरच्या घरी तयार करा हा हर्बल शॅम्पू
केमिकल्स असलेल्या शॅम्पूचा वापर केल्याने केस डॅमेज होण्याची शक्यता असते.
![Hair care tips: काळेभोर आणि चमकदार केस हवेत? घरच्या घरी तयार करा हा हर्बल शॅम्पू Hair care tips make herbal shampoo at home Hair care tips: काळेभोर आणि चमकदार केस हवेत? घरच्या घरी तयार करा हा हर्बल शॅम्पू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/25/5c679e05468501e69cdb3b81a1076d5e_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अनेकांना केस गळणे, केस पांढरे होणे, केसात कोंडा होणे इत्यादी समस्या असतात. यासाठी लोक पार्लरमध्ये जाऊन स्पा करतात. प्रदुषण आणि केसांची निगा न राखणं या कारणांमुळे केस गळतीला सामोरे जावे लागते. केमिकल्स असलेल्या शॅम्पूचा वापर केल्याने केस डॅमेज होण्याची शक्यता असते. घरात असलेल्या काही गोष्टींने तुम्ही स्वत: शॅम्पू तयार करू शकता. जाणून घेऊयात घरच्या घरी हर्बल शॅम्पू तयार करण्याची सोपी पद्धत-
घरच्या घरी शॅम्पू तयार करण्याची सोपी पद्धत-
-एका मोठ्या पातेल्यात सुकवलेले रिठे, आवळा आणि शिककाई सम प्रमाणात म्हणजेच एक वाटी घ्यावे.
-त्यामध्ये ब्राम्ही, भृगंराज, मेथीचे दाणे, कलौजीं हे सर्व मिक्स करावे. या मिश्रणामध्ये 1/30 ते 2 लिटर पाणी घालावे.
-पाणी घातलेले हे मिश्रण थोड्या वेळाने मऊ पडेल.
-मऊ पडल्यानंतर हे मिश्रणातील रिठा आणि शिकेकाईच्या बिया काठून टाकाव्यात.
-त्यामध्ये कडुलिंब, जास्वंदी आणि कढीपत्त्याची पानं घालून हे मिश्रण 10 मिनीटे उकळवून घ्यावे.
-उकळवून झाल्यानंतर ते थंड होईपर्यंत झाकून ठेवावे.
-हे मिश्रण थंड झाल्यानंतर सुती कापडामधून गाळून घ्यावे.
-तुमचा हर्बल शॅम्पू तयार आहे.
Diwali 2021 Skin Care: फेस्टिव्ह सीझनमध्ये ग्लोइंग स्किनसाठी ट्राय करा 'या' सोप्या टिप्स
हा शॅम्पू पातळ असतो. घट्ट करण्यासाठी गाळून उरलेले मिश्रणातील पदार्थ मिक्सरमध्ये बिरक करून शॅम्पूमध्ये मिक्स करा. एक महिना हा शॅम्पू तुम्ही फ्रिजमध्ये स्टोअर करू शकता. आंघोळीच्या आधी अर्धा तास ते एक तास या शॅम्पूने केसांची हलक्या हाताने मालिश करावी. हर्बल शॅम्पू केसांच्या मुळांना लावावा. शॅम्पू धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नये. हर्बल शॅम्पूचा फक्त 3ते 4 वेळा वापर केल्याने केस गळती थांबते. तसेच कोंडा देखील जातो. केस दाट, काळेभोर आणि चमकदार होतात.
टिप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.
Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)