Hair Care Tips : सुंदर, लांबसडक आणि निरोगी केस हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते. आपल्या केसांचे आरोग्य हे आपला आहार आणि जीवनशैलीवर अवलंबून असते. जर आपण आपल्या आहाराची योग्य काळजी घेतली, तर त्याचा परिणाम आपल्या केसांवर देखील दिसायला लागतो. केसांची वाढ, त्यांचे आरोग्य हे अनुवांशिकतेवर देखील अवलंबून असते. केस निरोगी राहावेत म्हणून आपण अनेक प्रकारची औषधे, तेल वापरतो. याशिवाय बाजारात मिळणारी महागडी उत्पादने देखील वापरतो.
मात्र, केमिकल युक्त उत्पादनांच्या वापरामुळे केसांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. आपले केस नैसर्गिक पद्धतीने कसे सुंदर आणि निरोगी ठेवायचे, हे आपल्याला माहित असले पाहिजे. यासाठी स्वयंपाकघरातील साध्या गोष्टी देखील उपयुक्त ठरू शकतात.
कोरफडीचा रस : कोरफडीचा गर अर्थात एलोवेरा जेल त्वचेसोबतच केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. कोरफड प्रोटीओलाइटिक एन्झाईम्सने समृद्ध आहे, जे केसांच्या मृत पेशी दुरुस्त करतात. याच्या सेवनाने केसांचे आरोग्य हळूहळू सुधारते. याशिवाय केसांची वेगाने वाढ देखील होऊ लागते. यासाठी रोज सकाळी एक ग्लास कोरफडीचा रस प्यावा.
केळी आणि बदाम स्मूदी : केळी आणि बदाम दोन्ही केसांसाठी अतिशय फायदेशीर घटक आहेत. बदामामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि झिंकसारखी खनिजे असतात. केसांसाठी हे सगळे घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. शिवाय यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई खराब केसांना निरोगी बनवण्यात खूप मदत करते. तर, केळ्यामध्ये कॅल्शियम आणि फॉलिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते, जे केस निरोगी आणि मजबूत बनवण्यास मदत करते. यासाठी एका ग्लास दुधात बदाम, मध, दालचिनी आणि केळी एकत्र करून त्याची स्मूदी बनवा आणि ही स्मूदी रोज प्या.
जवाचे पाणी : जवामध्ये लोह आणि तांब्याचे गुणधर्म असतात, ज्यामुळे लाल रक्तपेशींचे उत्पादन वाढते. हे पाणी केसांच्या रोम छिद्रांना मजबूत करते आणि केसांच्या वाढीस गती देते. यासाठी पाण्यात जव आणि मीठ घालून ते पाणी उकळा. नंतर त्यात मध आणि लिंबू मिसळून ते सेवन करा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :