KGF Chapter 2 BO Collection : 'डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस' हा हॉलिवूड चित्रपट रिलीज होऊनही, 'KGF: Chapter 2' हिंदी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. प्रशांत नील दिग्दर्शित आणि यश स्टारर चित्रपट आता 500 कोटींच्या अगदी जवळ पोहोचला आहे. लवकरच हा चित्रपट ‘बाहुबली 2’शी स्पर्धा करेल. या चित्रपटाने चांगला नफा मिळवला आणि KGF 2 हा हिंदीतील आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे.



KGF 2 ला या यादीत दुसरे स्थान मिळाले आहे. KGF बॉक्स ऑफिसवर चमकदार कामगिरी करत आहे. जगभरात चित्रपटाने 1110 कोटींचा टप्पा पार केला आहे. यशसोबत केजीएफमध्ये रवीना टंडन आणि संजय दत्त दिसले आहेत.


अवघ्या 23 दिवसांत 400 कोटी क्लबमध्ये सामील!


KGF 2 च्या हिंदी आवृत्तीने 400 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे, हा एक मोठा विक्रम आहे. फक्त दोनच चित्रपट आहेत ज्यांनी हा टप्पा ओलांडला आहे, त्यापैकी एक म्हणजे ‘बाहुबली: द कन्क्लूजन’, ज्याने केवळ हिंदी व्हर्जनमधून 511 कोटी कमावले आहेत. त्यानंतर, आमिर खान स्टारर ‘दंगल’ने 387.38 कोटींचा व्यवसाय केला होता. पण, आता यश स्टारर चित्रपटाने ‘दंगल’ आणि ‘आरआरआरला’ मागे टाकले आहे. आतापर्यंत, प्रशांत नील दिग्दर्शित KGF: Chapter 2 चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने 412.80 कोटी कमावले आहेत.


दक्षिण चित्रपटसृष्टीतील स्टार अभिनेता यश, बॉलिवूड अभिनेता संजय दत्त आणि रवीना टंडन स्टारर चित्रपट 'KGF 2' 14 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तेव्हापासून आजपर्यंत या चित्रपटाने जगभरात 1100 कोटींहून अधिक कलेक्शन केले आहे. या चित्रपटाने तामिळनाडूमध्येही एक विक्रम केला आहे, जो या राज्यातील पहिला कन्नड चित्रपट बनला आहे, ज्याने 100 कोटी कमावले आहेत.


हेही वाचा :