Health Tips : उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. अशा वेळी हंगामी फळे खाणं गरजेचं आहे. टरबूज हे प्रत्येकाचं आवडतं फळ आहे. कारण ते आपल्या शरीराला हायड्रेट ठेवते. टरबूजाबरोबरच त्याच्या बिया देखील खूप उपयुक्त मानल्या जातात कारण त्यात अनेक गुणधर्म आढळतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यात अनेक पोषक घटक आढळतात जसे- व्हिटॅमिन ए, सी, ई, झिंक, मॅग्नेशियम इ. या पोषक तत्वांमुळे शरीराच्या अनेक समस्या दूर होतात, त्यामुळे या उन्हाळ्यात तुम्ही टरबूज आणि त्याच्या बियांचेही सेवन करावे, जेणेकरून तुमच्या शरीराला अनेक फायदे मिळतील, चला जाणून घेऊया त्याच्या गुणधर्मांबद्दल.


रक्तदाब कमी - टरबूजाच्या बियांमध्ये भरपूर पोटॅशियम असते. पोटॅशियम युक्त आहार घेतल्यास रक्तदाब कमी करता येतो, ते खाल्ल्याने स्ट्रोकचा धोका कमी होतो.


दृष्टी सुधारते - टरबूजाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन 'ए' आणि बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते. जे तुमच्या डोळ्यांसाठी खूप चांगले मानले जाते. टरबूजाच्या बियांचे नियमित सेवन केल्यास मोतीबिंदूचा धोका कमी होतो. यासोबतच डोळ्यांची दृष्टी सुरक्षित ठेवण्यासाठीही हे फायदेशीर आहे.


गरोदरपणात फायदेशीर - टरबूजाच्या बिया फोलेटसाठी उत्तम असतात, जे तुमच्या शरीरातील अतिरिक्त सोडियम काढून टाकतात. अशा स्थितीत गरोदर महिलांमध्ये पाणी टिकून राहण्याची समस्या कमी होऊ शकते. त्यामुळे गर्भवती महिलांसाठी टरबूजाच्या बिया देखील फायदेशीर ठरू शकतात. मात्र, गरोदरपणात तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच याचे सेवन करा.


रोगप्रतिकारशक्ती वाढते - टरबूजाच्या बियांचा आहारात समावेश केल्याने तुमच्या शरीराला व्हिटॅमिन 'सी' मुबलक प्रमाणात मिळते. वास्तविक, याचे सेवन केल्याने रक्तातील पांढऱ्या रक्तपेशींचे प्रमाण वाढवता येते, रक्तातील पांढऱ्या रक्त पेशी वाढवून रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते.


चिंता कमी करते - टरबूजाच्या बियांचे सेवन केल्याने मेंदूतील रक्त परिसंचरण सुधारते. ज्यामुळे तुमचा मेंदू शांत होतो. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha