Health Care: सध्याच्या धकाधकीच्या जीवनामुळे आपल्या आरोग्यकडे लक्ष देणं अनेकांना कठिण होतं. याचाच मोठा परिणाम आपल्या शरीरावर होतो. अशातच संसर्ग आणि असंसर्गजन्य आजार (NCDs) रोखण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. भारतात असंसर्गजन्य आजार अत्यंत तीव्र गतीने वाढत आहे. आपल्या देशात कार्डिओव्हॅस्क्युलर आजार, कर्करोग, श्वसनाचे आजार आणि मधुमेह आजार खूप तीव्र गतीने वाढत आहे. या आजारांमुळे मागील तीन दशकांत मृत्यूदर 83 टक्क्यांनी वाढला आहे. भारतात 26 ते 59 वयोगटातील लोकांमध्ये हा आजार सर्वात जास्त आढतो, असे असोकेमच्या (2021) अहवालात सांगण्यात आले आहे. यातील मधुमेह आणि हायपरटेन्शन हे प्रामुख्याने ताणाशी संबंधित आजार असून भारतात याचे अनुक्रमे 2.9 टक्के आणि 3.6 टक्के रुग्ण आहेत.
शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार यांसोबतच स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. देशात मोठ्या प्रमाणात असे लोक आहेत, ज्यांना योग्य आहार मिळत नाही, असं या अहवालात सांगण्यात आले आहे. यामुळेच देशात कुपोषणाचे प्रमाण देखील वाढले असल्याचे या आवाहला सांगण्यात आले आहे. हे आजार टाळण्यासाठी किंवा यापासून बचावासाठी व्हिटॅमिन सी हे खूप मत्वाचे आहे. व्हिटॅमिन सी हे नैसर्गिकरित्या आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
याबाबतच माहिती देताना लीलावती रुग्णालयातील एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. शशांक जोशी म्हणाले आहेत की, ''व्हिटॅमिन सी हा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यावश्यक घटक आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या सामान्य एनसीडी असलेल्या रुग्णांना इतरांपेक्षा जास्त जीवनसत्त्वे आवश्यक असू शकतात. व्यक्ती व्हिटॅमिन सी पूरक आहाराद्वारे आपल्या नियमित पोषण इनटेक वाढवू शकतात. यासाठी लिंबूवर्गीय फळे आणि टोमॅटोंसह समृद्ध, संतुलित आहाराचेही सेवन करू शकतात.'' यावरच बोलताना ग्लोबल मेडिकल अफेअर्सचे संचालक डॉ. पराग शेठ म्हणाले की, “व्हिटॅमिन सी मधून विविध प्रकारचे आरोग्याचे फायदे मिळतात. जसे प्रतिकारशक्ती आणि अँटीऑक्सिडंटच्या पातळी वाढवणे.''
देशातील नागरिकांमध्ये व्हिटॅमिन सीची कमतरता
देशभरातील नागरिकांमध्ये व्हिटॅमिन सीची कमतरता दिसून आली आहे. देशातील उत्तर आणि दक्षिण भारतात अनुक्रमे सुमारे 74 टक्के आणि 46 टक्के कमतरता आढळली आहे. ही कमतरता प्रामुख्याने असंसर्गजन्य आजारने ग्रस्त लोकांमध्ये अधिक दिसून आली आहे. यामुळे व्हिटॅमिन सीच्या कमतरतेसाठी सामान्य धोक्याच्या घटकांमध्ये वाढलेले वय (विशेषतः गॅरिएट्रिक लोकसंख्या), कुपोषण, प्रदूषण किंवा धूर, बायोमास इंधने यांच्या संपर्कात येणे, तंबाखूचे सेवन या गोष्टी कारण ठरतात. भारतीयांमध्ये या बाबी आढळून येतात.
व्हिटॅमिन सी समृध्द आहेत हे खाद्यपदार्थ
जेव्हा शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता होते, तेव्हा तुम्ही नैसर्गिक पदार्थांच्या मदतीने त्याची कमतरता भरून काढू शकता. यासाठी लिंबूवर्गीय फळांचा आहारात समावेश करावा. फळांमध्ये संत्री ही व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत मानली जाते. संत्री खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. हृदय आणि डोळ्यांसाठीही हे फायदेशीर आहे. सीझनमध्ये तुम्ही पेरूही खाऊ शकता. पेरूमध्ये संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असते. उन्हाळ्यात आंब्याला तुमच्या आहाराचा भाग बनवा. आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. याशिवाय आंब्यामध्ये ‘अ’ जीवनसत्त्वही आढळते. सर्व ऋतूंमध्ये आढळणारी पपई ही व्हिटॅमिन सीचा नैसर्गिक स्रोत आहे. पपईमध्ये व्हिटॅमिन सी आढळते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. अननस खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात मिळते. त्यामुळे हाडेही मजबूत होतात. स्ट्रॉबेरी आणि किवीमध्येही व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात आढळते. याशिवाय इतरही अनेक आवश्यक पोषक घटक त्यात आढळतात जे तुम्हाला निरोगी ठेवतात.