Hair Care Tips : जवसाच्या बिया केसांसाठी वरदान; केसांच्या वाढीसाठी 'या' 3 प्रकारे वापर करा
Hair Care Tips : केसांसाठी जवसाच्या बियांकडे दुर्लक्ष केले जाते, परंतु या बिया केसांना अनेक प्रकारे फायदे देऊ शकतात.
Hair Care Tips : आजकाल लोक आरोग्यासाठी तसेच सौंदर्यासाठी अधिक नैसर्गिक गोष्टींचा वापर करू लागले आहेत. विशेषत: केसांची काळजी (Hair Care Tips) घेताना लोक अनेक घरगुती उपाय करून बघतायत. केस आपल्या सौंदर्यात भर घालतात. मात्र, अनेक उपाय करूनही काही कारणांमुळे केस निर्जीव होतात, केस तुटतात, केसांची वाढ होत नाही आणि केस गळतात अशी अनेकांची तक्रार असते. अशा परिस्थितीत, तुम्ही जवसाच्या बियांचा विविध मार्गांनी वापर करू शकता.
केसांसाठी जवसाकडे दुर्लक्ष केले जाते, परंतु ते केसांना अनेक फायदे देऊ शकते. उत्तम पोषक तत्वांनी समृद्ध असल्याने, ते टाळू आणि केसांसाठी आश्चर्यकारक कार्य करू शकते. आज या ठिकाणी आम्ही तुम्हाला केसांसाठी जवसाच्या बियांचे फायदे आणि केसांच्या वाढीसाठी ते कसे वापरावे याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
जवसाचे फायदे
अँटिऑक्सिडंट्स, निरोगी चरबी आणि फायबरने समृद्ध, जवस आरोग्यासाठी तसेच केसांसाठी खूप फायदेशीर आहे. हे केस निरोगी आणि मजबूत बनविण्यात मदत करू शकते . हे तुमच्या केसांच्या कूपांचे पोषण करण्यास आणि तुमचे केस स्मूथ करण्यात मदत करू शकते. तसेच, केसांसाठी नियमितपणे जवस वापरल्याने केस अधिक लांब आणि चमकदार होण्यास मदत होते. केसांसाठी जवसाच्या बिया कशा वापरायच्या ते जाणून घेऊयात.
जवसाच्या बियांचे जेल
तुम्ही जवसाच्या बियांचं जेल केसांना वापरू शकता. हे जेल तुम्ही घरीही तयार करू शकता. जवस, एलोवेरा जेल आणि पाण्याच्या मदतीने तुम्ही हे जेल बनवू शकता. फक्त थोड्या प्रमाणात जवस हेअर जेल घ्या आणि ते तुमच्या केसांवर लावा. त्यानंतर याने तुमच्या टाळूची मालिश करा. 15 मिनिटे जेल केसांवर ठेवा आणि नंतर नियमित शैम्पूने केस धुवा.
जवसाचा हेअर मास्क
तुम्ही जवसाचा हेअर मास्क देखील वापरू शकता. यासाठी फक्त एक चमचा जवस घ्या आणि बारीक करा. त्यात दोन चमचे खोबरेल तेल घाला. ते चांगले मिक्स करा आणि नंतर हे मिश्रण केसांना लावा. याने तुमच्या टाळूची मसाज करा आणि 20 मिनिटे केसांवर राहू द्या, नंतर केस शैम्पूने धुवा.
केसांसाठी जवस तेल
केसांसाठी तेल म्हणून तुम्ही जवसाचं तेल वापरू शकता. जवस वापरण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. केसांसाठी जवस तेल आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वापरा. सुमारे पाच ते 10 मिनिटे याने तुमच्या टाळूची मालिश करा. तसेच केसांना चमक आणण्यासाठी ते लावा.
केसांसाठी जवसाचे फायदे
- जवसमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड भरपूर असते, ज्यामुळे टाळूची संवेदनशीलता आणि जळजळ कमी होण्यास मदत होते.
- हे केसांना हायड्रेट करते. जवसमध्ये आवश्यक पोषक घटक असतात, जे तुमच्या केसांपर्यंत जाऊन त्यांना योग्य पोषण देतात.
- जवसमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असते, ज्यामुळे ते खराब झालेले केस दुरुस्त करण्यास मदत होते.
- जर तुम्हाला केसांची वाढ हवी असेल तर जवस तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.
- कोंड्याच्या समस्येवरही जवस खूप गुणकारी आहे. हे हानिकारक जीवाणूंना प्रतिबंधित करते, ज्यामुळे केसांत कोंडा होण्यापासून आराम मिळतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Hair Care Tips : केसांसाठी 'ही' हेअर ट्रीटमेंट होऊ शकते धोकादायक! वेळीच आपल्या केसांची काळजी घ्या