एक्स्प्लोर

Beauty Tips : पिंपल्स, कोरडी त्वचा यासारख्या समस्यांनी त्रस्त आहात? मग 'हे' 7 उपाय करुन पाहा

Glowing Skin Secrets : पिंपल्स, ड्राय स्किन, काळवंडलेली त्वचा अशा वेगवेगळ्या समस्यांपासून त्रस्त असाल, तर येथे दिलेल 7 उपाय करून पाहा.

Glowing Skin Secrets : आपण सुंदर दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. ग्लोईंग आणि डागरहित त्वचा (Skin) प्रत्येकालाच हवी असते, मग ती स्त्री असो वा पुरुष. सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवणं फार काही कष्टाचं काम नाही. यासाठी तुम्हाला महागड्या क्रीम किंवा इतर कोणतीही खास ट्रीटमेट घेण्याचीही गरज नाही. काही नियमित आणि सोप्या आरोग्यदायी सवयींमुळे तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येऊन तुमची त्वचा तजेलदार होईल. पिंपल्स, ड्राय स्किन, काळवंडलेली त्वचा अशा वेगवेगळ्या समस्यांपासून त्रस्त असाल, तर येथे दिलेल 7 उपाय करून पाहा. हे सोपे उपाय नियमित केल्यास तुम्हाला फरक नक्की जाणवेल.

भरपूर पाणी प्या

तुमची त्वचा हायड्रेट तर चेहऱ्यावर आपोआप ग्लो येऊन तुम्ही सुंदर दिसता. त्यामुळे भरपूर पाणी पिऊन चेहरा हायड्रेट ठेवा. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होईल आणि मुरुमांची समस्या उद्भवणार नाही. त्यामुळे दिवसभरात किमान 8 ग्लास पाणी प्या.

व्यायाम करा

व्यायाम केल्यानेही तुमची त्वचा चमकदार होते. व्यायाम केल्याने रक्ताभिसरण योग्यप्रकारे होते. यामुळे त्वचेच्या मृत पेशींना जीवदान मिळते आणि तुमचा चेहरा तजेलदार दिसतो.

ताणतणाव दूर करा

सुंदर आणि ग्लोईंग त्वचा हवी असेल तर ताणतणाव दूर करा. तुम्ही तणाव घेतल्यास त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतो. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येऊन चेहरा कोमजल्यप्रमाणे दिसतो. त्यामुळे स्वतःला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या निरोगी ठेवा, यामुळे त्वचा सुधारण्यास मदत होईल.

पोषक आहार घ्या

सुंदर दिसण्यासाठी पोषक तत्वांनी युक्त आहार घेणं आवश्यक आहे. तुमच्या आहारात हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करा. तेलकट आणि फास्ट फूड खाणं टाळा. त्याऐवजी प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट युक्त अन्न खाल्ल्याने चेहऱ्याचे सौंदर्य वाढेल.

पुरेशी झोप घ्या

त्वचा दुरुस्त करण्यासाठी पुरेशी झोप घेणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे किमान सात ते आठ तास पुरेशी झोप घ्या, यामुळे चेहऱ्यावर चमक येईल. डार्क सर्कलची समस्याही दूर होऊन तुमचा चेहरा चमकदार होईल.

त्वचेची काळजी घ्या

सुंदर दिसण्यासाठी, त्वचेची चांगली निगा राखणंही गरजेच आहे. यासाठी तुम्ही दिवसातून दोनदा चेहरा स्वच्छ धुतला पाहिजे. दर आठवड्याला स्कीन एक्सफोलिएट करण्यासाठी स्क्रब करा. चेहऱ्यावर मुलतानी माती, बेसन आणि टोमॅटोचा रस यासारख्या नैसर्गिक पदार्थांपासून तयार केलेला मास्क लावा. 

सनस्क्रीन वापरा

सूर्याच्या हानिकारक किरणांपासून तुमच्या त्वचेचं संरक्षण करण्यासाठी नेहमी सनस्क्रीन वापरा. यासाठी 30 किंवा त्याहून जास्त SPF असलेली सनस्क्रीन वापरा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Stomach Growling : सावधान! पोटातून गुडगुड आवाज येतोय? याकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या, नाहीतर...

महत्त्वाच्या बातम्या

Health: चेहऱ्याला स्पर्श करताना भीती का वाटते? वारंवार होणाऱ्या वेदनांचा रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात..
चेहऱ्याला स्पर्श करताना भीती का वाटते? वारंवार होणाऱ्या वेदनांचा रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात..
Health: नाश्ता टाळणं पडेल महागात? हृदयाच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? नाश्ता टाळण्याचे दुष्परिणाम काय? डॉक्टर सांगतात...
नाश्ता टाळणं पडेल महागात? हृदयाच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? नाश्ता टाळण्याचे दुष्परिणाम काय? डॉक्टर सांगतात...
World Heart Day 2026 : तीन वर्षांपासून वार्षिक आरोग्य तपासणी केली नाही? मग तुमचं हृदय तुम्हाला काय सांगतंय, हे जाणून घ्या
तीन वर्षांपासून वार्षिक आरोग्य तपासणी केली नाही? मग तुमचं हृदय तुम्हाला काय सांगतंय, हे जाणून घ्या
Heart Health: रोजची कामं करताना 'ही' चार लक्षणे दिसली तर चुकुनही दुर्लक्ष करू नका, 'हार्ट फेल्युअर'चा सर्वाधिक धोका, तातडीने डॉक्टरांकडे जा
रोजची कामं करताना 'ही' चार लक्षणे दिसली तर चुकुनही दुर्लक्ष करू नका, 'हार्ट फेल्युअर'चा सर्वाधिक धोका, तातडीने डॉक्टरांकडे जा

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
बळीराजापुढं दुष्काळाचं ताट, जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न? 'कुट्टी'चा खर्च परवडेना; शेतकरी हवालदील
Embed widget