Global Family Day 2023 : आज 'जागतिक कुटुंब दिन'; जाणून घ्या कुटुंबाचं महत्त्व आणि उद्देश
Global Family Day 2023 : जागतिक कौटुंबिक दिन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारी रोजी साजरा केला जातो.
Global Family Day 2023 : जागतिक कुटुंब दिन (Global Family Day) दरवर्षी 1 जानेवारीला नवीन वर्षाच्या दिवशी साजरा केला जातो. आजच्या न्यूक्लिअर फॅमिली पद्धतीत कौटुंबिक फॅमिली किती महत्त्वाची आहे. हे म्हणणं अधोरेखित करणारा हा दिवस आहे. आरोग्य, शिक्षण, लैंगिक समानता, मुलांचे हक्क आणि सामाजिक समावेश यासारख्या कुटुंबांच्या कल्याणासाठी केंद्रस्थानी असलेल्या महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाच्या माध्यमातून कुटुंबपद्धती, एकता, प्रेम, जिव्हाळा याचा प्रचार केला जातो.
आजच्या काळात जिथे अर्धा अधिक वेळ कामात घालवला जातो. कामाच्या तणावात जातो. ही परिस्थिती लक्षात घेऊन जागतिक कुटुंब दिनाची (Global Family Day) स्थापना करण्यात आली आहे.
जागतिक कुटुंब दिनाचे महत्त्व (Global Family Day 2023 History) :
जागतिक कौटुंबिक दिन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारी रोजी साजरा केला जातो. या उद्देशाने की या दिवसाच्या माध्यमातून जगभरातील सर्व देश, धर्म यांच्यात शांतता प्रस्थापित करता येईल आणि युद्ध आणि अहिंसा टाळता येईल. याबरोबरच कुटुंबालाही खूप महत्त्व देण्यात आले आहे. कारण कुटुंबातूनच शांतता प्रस्थापित होऊ शकते. विविध संस्कृती, धर्म, भाषा, परंपरा असतानाही हे जगाचे कुटुंब आहे आणि कुटुंबात युद्धाची परिस्थिती निर्माण होऊ नये. प्रेमळ कुटुंबासाठी शांतता आवश्यक आहे, म्हणून या दिवसाची स्थापना करण्यात आली आहे. आणि हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो.
जागतिक कुटुंब दिनाचा उद्देश :
आजच्या काळात एकमेकांसोबत घालवायला कोणालाच वेळ नाही. तुमच्या व्यस्त जीवनातून थोडा वेळ काढून कुटुंबाबरोबर वेळ घालवणे हा या दिवसाचा उद्देश आहे. हा दिवस साजरा करण्यासाठी वर्षाचा पहिला दिवस निवडण्यात आला आहे कारण याद्वारे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवून नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक भावनेने करू शकता आणि येणाऱ्या पिढ्यांना प्रोत्साहन देऊ शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :