'हे' जगातील असे देश आहेत, जिथे एकही मुस्लिम नाही, इतिहासाशी संबंधित कारण जाणून घ्या
Muslim Country : जगातील 'हा' पहिला देश आहे जिथे एकही मुस्लिम अनुयायी नाही. या देशात फक्त ख्रिश्चन धर्म मानणारे लोक राहतात.
Muslim Country : जगातील बर्याच देशांमध्ये तुम्हाला इस्लाम (Islam) धर्म मानणारे लोक सापडतील. पाकिस्तान, मालदीव, इंडोनेशिया, अफगाणिस्तान हे असे देश आहेत. जे जगभरात त्यांच्या इस्लामिक मान्यतेसाठी ओळखले जातात. भारताबद्दल बोलायचे झाले, तर 2011 च्या जनगणनेनुसार भारतात एकूण 17 कोटी मुस्लिम आहेत. मात्र, भारत हा लोकशाही देश असून येथे संविधानानुसार कायदा चालतो. परंतु जिथे एकही मुस्लिम आढळत नाही, जगातील अशा देशांबद्दल जाणून घ्या
ज्या देशात एकही मुस्लिम नाही
ज्या देशात एकही मुस्लिम नाही, असा देश म्हणजे व्हॅटिकन सिटी, हा पहिला देश आहे जिथे मुस्लिम धर्माचा एकही अनुयायी आढळत नाही. या देशात फक्त ख्रिश्चन धर्म मानणारे लोक राहतात. व्हॅटिकन सिटी हे ख्रिश्चनांसाठी पवित्र शहर आहे, जसे मक्का मुस्लिमांसाठी मदिना आहे. या देशाची लोकसंख्या 800 च्या आसपास आहे. दुसरीकडे, वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूच्या अहवालानुसार, व्हॅटिकन व्यतिरिक्त जगात 47 देश आहेत जिथे एकही मुस्लिम राहत नाही. या देशांमध्ये टोकेलाऊ, नियू, फॉकलंड बेट, कुक आयलंड, ग्रीनलँड, सोलोमन आयलंड, मोनाको यांसारख्या अनेक देशांचा समावेश आहे जेथे मुस्लिम राहत नाहीत.
सर्वाधिक मुस्लिम कुठे आहेत?
वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू वेबसाइटच्या अहवालानुसार, आफ्रिकेत इस्लामिक रिपब्लिक ऑफ मॉरिटानिया नावाचा एक देश आहे, जिथे लोकसंख्या 47 लाखांपेक्षा जास्त आहे, तर मुस्लिमांची लोकसंख्या 38 लाखांपेक्षा जास्त आहे. देशांच्या आधारे मुस्लिम लोकसंख्येच्या यादीत वेबसाइटने या देशाला पहिले स्थान दिले आहे, तर सोमालिया, ट्युनिशिया, अफगाणिस्तान, इराण, तुर्की, येमेन हे देश देखील या यादीत सर्वात वर आहेत, जिथे मुस्लिमांची लोकसंख्या अधिक आहेत. या यादीत पाकिस्तानचे स्थान 23 व्या क्रमांकावर आहे.
एकही मशिद नसलेले देश!
पहिला देश स्लोव्हाकिया आहे, जो काही वर्षांपूर्वी चेकोस्लोव्हाकियापासून वेगळे झाल्यानंतर निर्माण झाला. या देशात सुमारे 5000 मुस्लिम राहतात. या देशात मशीद बांधण्याबाबत अनेक वाद झाले आहेत. सन 2000 मध्ये स्लोव्हाकियाच्या राजधानीत इस्लामिक केंद्राच्या स्थापनेवरून वाद निर्माण झाला होता. स्लोव्हाकियामध्ये इस्लामला अधिकृत धर्माचा दर्जा नाही. 30 नोव्हेंबर 2016 रोजी, स्लोव्हाकियाने एक कायदा केला, ज्यानंतर त्याने आपल्या देशात इस्लामला अधिकृत धर्माचा दर्जा देणे बंद केले. तर, एस्टोनिया हा दुसरा देश आहे जिथे एकही मशिद नाही. या देशात मुस्लिम लोकसंख्या खूपच कमी आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, तेव्हा तेथे 1508 मुस्लिम राहत होते, पण आता ही संख्या खूपच कमी झाली आहे. इथे मशीद नाही. येथे सुन्नी टाटार आणि शिया अझरी मुस्लिम सहसा एकत्र राहतात, ज्यांनी एकेकाळी रशियन सैन्यात सेवा केली होती. एस्टोनियामध्ये काही ठिकाणी लोक प्रार्थनेसाठी सामान्य फ्लॅटमध्ये देखील जमतात. येथे सुन्नी आणि शिया एकत्र नमाज अदा करतात. इथले मुस्लिम सामान्यतः मध्यम मानले जातात.
इतर महत्वाच्या बातम्या