Friendship Tips : 'ही' मैत्री तुमच्यासाठी धोकादायक, अशा मैत्रीपासून वेळीच सावध व्हा; जाणून घ्या मैत्रीचे प्रकार
Friendship Tips : जर तुम्ही योग्य वेळी योग्य मैत्री केली तर तुमच्या आयुष्यातील अनेक अडथळे सहज दूर होतात.
Friendship Tips : मैत्री हे जगातील सर्वात सुंदर नातं आहे. मैत्रीचं (Friendship) नातं रक्ताचं नातं नसतं, पण हे नातं रक्ताच्या नात्यापेक्षा कमी नसतं. काही लोकांसाठी, मैत्रीचं नातं हे इतर कोणत्याही नात्यापेक्षा मोठं असतं. तुमच्या यशात-अपयशात, सुख-दु:खात नेहमी तुमची मैत्री तुम्हाला साथ देते. यासाठी आपल्या आयुष्यात खास मित्र-मैत्रीण असणं फार गरजेचं आहे. असे मित्र-मैत्रीण मिळायला खरंतर भाग्यच लागतं. यासाठी जर तुम्ही योग्य वेळी योग्य मैत्री केली तर तुमच्या आयुष्यातील अनेक अडथळे सहज दूर होतात. मात्र, जर तुमची संगत जर चुकीची असेल तर त्याचे अनेक नुकसानही तुम्हाला सहन करावे लागतात. या ठिकाणी आम्ही तुम्हाला कोणत्या लोकांपासून मैत्री करू नये किंवा सावध राहावे यासाठी काही टिप्स सांगणार आहोत. ज्या तुम्ही देखील फॉलो केल्या तर तुम्हीदेखील अशा स्वार्थी मैत्रीपासून दूर राहू शकता.
चेष्टा करणाऱ्या मैत्रीपासून दूर राहा : ज्या ठिकाणी आपल्या वागणुकीवर, पेहरावावर आपली चेष्टा उडवली जाते. आपला अनादर केला जातो अशा मैत्रीपासून दूर राहणंच योग्य आहे. अनेकदा लोक विनोदात गुंडाळून तुमचा अपमान करतात. अशा वेळी काहीही न बोलता त्या मैत्रीपासून दूर राहणंच योग्य आहे.
एकतर्फी मैत्री : अनेकदा मैत्री कालांतराने एकतर्फी होते. कोणतेही मानवी नातेसंबंध दोन्ही बाजूंनी समान असले, ते नातं टिकवून ठेवण्यासाठी धडपड असली तर ती मैत्री अधिक काळ टिकते. मात्र, जर तुम्हाला असं वाटत नसेल तर त्या मैत्रीत गुंतून राहू नका. याचा अर्थ तुमच्या मित्र किंवा मैत्रीणीला तुमच्या मैत्रीत कोणताही इंटरेस्ट नाही हे वेळीच ओळखा आणि अशा मैत्रीपासून दूर व्हा.
चांगल्या वेळीच सोबत असणारे मित्र : आपल्या सर्वांचे काही मित्र असे असतात जे आपल्या फक्त चांगल्या वेळेतच आपल्याबरोबर असतात. पण, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की जो मित्र आपल्याला गरजेच्या वेळी मदत करतो तोच खरा मित्र असतो. त्यामुळे जे लोक फक्त तुमच्या चांगल्याच परिस्थितीत तुमच्या बरोबर असतात अशा मित्रांपासून दूर राहा.
स्पर्धात्मक मैत्री : काही मित्र असे असतात ज्यांना तुमचं यश आवडत नाही. ते तुमच्यावर सतत Jealous फील करतात. अशा मैत्रीपासून देखील दूर राहा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Weight Loss Tips : नो जीम, नो डाएटिंग.. झपटपट वजन कमी करण्यासाठी 'हे' 7 पेय सकाळी प्या