एक्स्प्लोर
जर तुमचं नाव सिंधू आहे, तर मिळवा फ्री पिझ्झा!

नवी दिल्ली: जर तुमचं नाव सिंधू असेल, तर आजच्या शनिवारी तुमच्यासाठी खास ऑफर आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये पीव्ही सिंधूने रौप्य पदकाची कमाई केल्यानिमित्त 'पिझ्झा हट'च्या वतीने एका विशेष ऑफरची घोषणा करण्यात आली आहे. ज्या महिलांचे नाव सिंधू आहे, त्यांना 'पिझ्झा हट'च्या वतीने फ्री पिझ्झा मिळणार आहे. पिझ्झा हटच्या वतीने यापूर्वीही रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेत्या साक्षी मलिकच्या नावानेही अशीच ऑफर देण्यात आली होती. पिझ्झा हटचे प्रबंध संचालक उन्नत वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या भारतीय अॅथलीटच्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी आमच्याकडून ही छोटीशी भेट आहे.''
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















