Health Tips : जिममध्ये न जाता फिट राहायचंय? तर, घरच्या घरी 'हे' व्यायाम करा
Fitness Tips : स्वतःला शारीरिकदृष्ट्या सक्रिय ठेवण्यासाठी, तुम्ही दररोज काही व्यायाम किंवा एॅक्टिव्हिटी केली पाहिजे.
Fitness Tips : सध्या कामाच्या वाढत्या ताणामुळे तसेच बिघडलेल्या जीवनशैलीमुळे सगळेचजण शारीरिक स्वास्थ्याला महत्त्व देत आहेत. यामध्ये काहींना जिममध्ये जाऊन व्यायाम करणं शक्य होतं. पण काहींना इच्छा असूनही जिमला जाता येत नाही. अशा वेळी तुम्ही घरच्या घरी राहूनसुद्धा व्यायाम करू शकता. आणि तंदुरुस्त राहू शकता. नेहमी तंदुरुस्त राहण्यासाठी जीवनशैली आणि आहार या दोन्ही गोष्टी सांभाळण्याची गरज आहे. स्वतःला शारीरिकदृष्ट्या सक्रिय ठेवण्यासाठी, तुम्ही दररोज काही व्यायाम किंवा एॅक्टिव्हिटी केली पाहिजे. जर तुम्हाला जिममध्ये न जाता स्वतःला फिट ठेवायचे असेल, तर जाणून घ्या घरच्या घरी कोणती कामे करावीत.
दोरी उड्या मारणे सुरू करा (स्किपिंग करा)
लहानपणी स्किपिंग हा प्रकार तुमच्यापैकी अनेकांनी केला असेल. हा व्यायाम शरीरासाठी चांगला मानला जातो. दोरीने उडी मारल्याने वजन कमी होण्यास आणि आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. फिट राहायचं असेल तर वजन कमी करावं लागेल. अशा परिस्थितीत, तुम्ही घरी किमान 10-15 मिनिटे दोरीवर उड्या मारायला सुरुवात करावी. यामुळे रक्ताभिसरण सुधारते.
रोज योगा करा
वाढत्या वजनामुळे आणि खराब जीवनशैलीमुळे तुम्ही त्रस्त असाल तर रोज योगा करा. यामुळे वजन कमी होते आणि आरोग्य चांगले राहते. योगासने तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यास मदत करतात. मात्र, तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच योगा आणि व्यायाम करावा.
आहार-व्यायामावर भर द्या
तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी आहार आणि व्यायामावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. आहार योग्य असेल तर त्याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे नेहमी आरोग्यदायी पदार्थ खावेत. याबरोबरच रोज व्यायामही करायला हवा. यामुळे नैराश्य आणि तणावासारख्या समस्यांपासूनही आराम मिळू शकतो.
बाहेर फिरायला जा
जर तुम्हाला तंदुरुस्त राहायचे असेल तर नियमितपणे बाहेर फिरायला जा. रोज फिरायला गेल्याने वजन कमी होऊन आरोग्य चांगले राहते. चालण्याने शरीरात रक्ताभिसरण व्यवस्थित राहते. यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होतो. हृदय नेहमी निरोगी राहते. जर कोणाला वाढत्या वजनाची चिंता असेल तर त्याने रोज फिरायला जावे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Health Tips : Weight Loss आणि Fat Loss मध्ये नेमका फरक काय? वजन कमी करण्याच्या 'या' 5 सामान्य चुका