Nykaa : Nykaa च्या फाल्गुनी नायर यांची 'EY Entrepreneur of the Year' म्हणून निवड, 'येथे' करणार भारताचे प्रतिनिधित्व
EY Entrepreneur of the Year : फाल्गुनी नायर Nykaa या ऑनलाइन सौंदर्य प्रसाधने विक्री कंपनीच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांना 2021 सालासाठी 'EY उद्योजक' म्हणून निवडण्यात आले आहे.
Nykaa : फाल्गुनी नायर (Falguni Nayar) Nykaa या ऑनलाइन सौंदर्य प्रसाधने विक्री कंपनीच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांना 2021 सालासाठी 'EY उद्योजक' (EY Entrepreneur of the Year) म्हणून निवडण्यात आले आहे. मंगळवारी एका निवेदनात याची घोषणा करताना, सल्लागार फर्म EY ने सांगितले की, फाल्गुनी 9 जून रोजी होणाऱ्या 'EY वर्ल्ड आंत्रप्रेन्योर ऑफ द इयर' कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
फाल्गुनी नायर यांनी 1983-84 मध्ये आयआयएम अहमदाबादमधून एमबीए केलंय. त्यांनी सुमारे 8 वर्ष एफ. फर्ग्युसन अॅंड कंपनीत काम केलंय. त्यानंतर जवळपास 20 वर्ष कोटक महिंद्रा बॅंकमध्ये त्या कार्यरत होत्या. फाल्गुनी या 51 वर्षाच्या असून त्यांचे पती संजय नायर अमेरिकेच्या प्रायव्हेट इक्विटी फर्म केकेआरचे सीईओ आहेत.
2012 मध्ये लॉन्च झाली Nykaa :
फाल्गुनी नायर या आधी इन्व्हेस्टमेंट बँकर होत्या. त्यांनी 2012 मध्ये सौंदर्य उत्पादनांच्या (Beauty Product) ऑनलाइन विक्रीसाठी Nykaa प्लॅटफॉर्म सुरू केला. नफ्यात झपाट्याने वाढ झालेल्या या स्टार्टअपने गेल्या दोन वर्षांत 100 हून अधिक ऑफलाइन स्टोअर्सद्वारे फॅशन आणि जीवनशैलीच्या क्षेत्रातही प्रवेश केला आहे.
ए एम नायक यांना जीवनगौरव पुरस्कार
ए एम नायक यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1965 मध्ये समूहात सामील झाल्यानंतर, नायक त्याचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक या पदापर्यंत पोहोचले.
कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले
कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव म्हणाले की, 'आंत्रप्रेन्योर ऑफ द इयर' पुरस्काराच्या शर्यतीत सहभागी झालेल्या 21 जणांचा एकत्रित महसूल 1.87 लाख कोटी रुपये आहे. आणि या उद्योजकांना 2.60 लाखांचा एकत्रित महसूल अधिक लोकांना रोजगार देतो.
महत्वाच्या बातम्या :