(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eye Care Tips : तुमची दृष्टी कधीच कमकुवत होणार नाही; रोज फक्त 'हे' काम करा
Eye Care Tips : शरीराला आतून आणि बाहेरून निरोगी ठेवण्यासाठी, आपण निरोगी आणि संतुलित आहार घेणं आवश्यक आहे.
Eye Care Tips : आजकाल बिघडलेल्या जीवनशैलीमुळे (Lifestyle). अनेकांना स्वतःकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे शरीरात पौष्टिकतेची कमतरता निर्माण होते. पोषणाअभावी आपले डोळे (Eye Care Tips) कमजोर होऊ लागतात. तसेच, काही लोक त्यांच्या आहाराची योग्य काळजी घेत नाहीत त्यामुळे दृष्टी कमकुवत होते. काही लोकांची दृष्टी लहानपणापासूनच कमजोर असते. कालांतराने काही लोकांची दृष्टी कमकुवत होत जाते. त्यामुळे अशा व्यक्तींना लवकर चष्मा लागतो. यातील सर्वात मोठं कारण म्हणजे पोषणाचा अभाव.
खरंतर, आपण जे काही खातो त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. म्हणून, निरोगी राहण्यासाठी, आपल्याला निरोगी आणि संतुलित आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. आजकाल लोक खूप जंक फूड खातात, ज्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते. यामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळतं. विशेषत: लहान मुलांना बाहेरचे अन्न खायला आवडते, त्यामुळे त्यांची दृष्टी दिवसेंदिवस कमी होत जाते. या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची दृष्टी कमकुवत होण्यापासून वाचवू शकता.
संतुलित आहार घ्या
शरीराला आतून आणि बाहेरून निरोगी ठेवण्यासाठी, आपण निरोगी आणि संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करावा ज्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि इतर खनिजे शरीरात पूर्ण होऊ शकतात. व्हिटॅमिन ए, सी, ई, झिंक आणि अँटी-ऑक्सिडंट्स युक्त आहार घेण्यास विसरू नका. या गोष्टींसाठी तुम्ही तुमच्या आहारात गाजर, बदाम, बीट, अंडी, एवोकॅडो आणि मासे यांचा समावेश करा.
स्क्रीन टाईमपासून स्वतःला दूर ठेवा
डोळ्यांच्या कमकुवतपणाचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपण आपली नजर टीव्ही किंवा मोबाईलवर बराच वेळ स्थिर ठेवतो. खरंतर, आजच्या काळात मोबाईलचा वापर लहान मुलं देखील अगदी सर्रास करतात. याचा थेट परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो. यामुळे, आपल्याला वारंवार डोकेदुखी, डोळे दुखणे आणि डोळ्यांत पाणी येण्याची समस्या उद्भवू शकते. या समस्या टाळण्यासाठी, आपण आपला स्क्रीन वेळ कमी केला पाहिजे.
डोळ्यांचा व्यायाम महत्त्वाचा
आपले डोळे दिवसभर सक्रिय असतात, जेव्हा आपण झोपतो तेव्हाच त्यांना विश्रांती मिळते. अशा स्थितीत डोळे थकतात. त्यांना आराम देण्यासाठी तुम्ही डोळ्यांशी संबंधित काही व्यायाम करू शकता. या व्यायामामुळे डोळ्यांना आराम तर मिळेलच पण दृष्टीही सुधारेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :