Health Tips : हे आजार होऊ शकतात दूर , दुधात मिसळा 'हा' पदार्थ; वाचा सविस्तर
रात्री झोपण्यापूर्वी दुधात एक चमचा तूप मिसळून ते प्या. याचे शरीरास अनेक फायदे होतात.अनेक मोठ्या आजारांपासून तुमची सुटका होण्यास मदत होते.
Milk With Desi Ghee : रोजच्या धावपळीच्या जीवनात आपली लाईफस्टाईल संपूर्ण बिघडून गेली आहे. यामुळेच आपल्या मागे काही ना काही आजार लागतात. चिंता आणि तणाव यामुळे आवश्यक असणारी झोप पूर्ण होत नाही. पुरेशी झोप न झाल्याने शरीरावर त्याचा मोठा परिणाम होतो. सोबतच रोजच्या दगदगीमुळे अनेकांना सांधेदुखीसारखे आजार मागे लागतात. तुपाचे आणि दुधाचे महत्व आयुर्वेदात मोठ्या प्रमाणावर सांगितले आहे. तुपाचे तर अनेक फायदे आहेत. याचा रोजच्या आहारात वापर केला तर तुमची त्वचा छान दिसू शकते. मधुमेहासारख्या आजावरचा एकमेव उपाय म्हणजे तूप. तसेच दुधाचा वापर स्किनसाठी आणि शरीरातील Heat कमी करण्यासाठी होतो. या सगळ्यावर उपाय म्हणजे रोज रात्री झोपण्यापूर्वी दुधात एक चमचा तूप मिसळून ते पिऊन घ्यावे. काय आहेत याचे फायदे घ्या जाणून.
दुधात तूप मिसळून प्यायल्याने काय होतात फायदे (Benefits Of Milk And Ghee)
1. एक ग्लास दुधात तूप मिसळून प्यायल्याने पचन प्रक्रिया सुधारण्यास मदत होते. यामुळे शरीरातील मेटॅबाॅलिज्म वाढते.
2. तुम्हाला खूप जास्त स्ट्रेस असेल आणि रात्रीच्या वेळी झोपण्यात अडचण येत असेल तर तुम्ही एक ग्लास दुधात तूप घालून ते पिऊन घ्यावे. याने रात्रीची झोप चांगली येईल आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला फ्रेश वाटू शकते.
3. सांधेदुखीचा त्रास जर तुम्हाला असेल तर दूध आणि तूप याचे सेवन तुम्ही नियमित करायला हवे. यामुळे सांध्यातील ल्युब्रिकेशन वाढण्यास मदत होते. दुधामुळे शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण नियंत्रीत राहते.
4. तूप आणि दूध यात नॅचरल मॉइश्चराइजर असते. रोज रात्री हे प्यायल्याने तुमची त्वचा सुंदर दिसू शकते. चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.
5. तसेच एक ग्लास दुधात तूप मिसळून प्यायल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते. फिजिकल अॅक्टिविटी करण्यास ताकद मिळते.
6. रात्री झोपण्यापूर्वी एक कप गरम दुधात तूप घालून प्यायल्यास मेंदूच्या मज्जातंतू शांत होतात. अशा प्रकारे दूध प्यायल्याने तुम्हाला खूप आराम मिळेल आणि चांगली झोप येण्यास मदत होईल. तूप खाल्ल्याने तणाव कमी होतो आणि मूडही चांगला राहतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
इतर महत्वाच्या बातम्या
Sleep : माणूस झोपेशिवाय किती दिवस जगू शकतो? जागरणावरही आहे मर्यादा
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )