दिवाळीत त्वचेची काळजी घेण्यासाठी 5 सोपे उपाय, त्वचा राहील चमकदार अन् ताजी
दिवाळीपूर्वीची साफसफाई आणि वातावरणातील प्रदूषणामुळे त्वचेवर मळ आणि तेल जमा होते.चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी जास्त खर्च करण्याची काहीच गरज नाही.

Skin Health: दिवाळी हा आनंद, रोषणाई आणि उत्साहाचा सण आहे. अशा वेळी आपल्या त्वचेची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. सणाच्या काळात जास्त तळलेले-भाजलेले अन्न खाणे, सततच्या धावपळीमुळे त्वचा थकीत आणि डल दिसू लागते. जर तुम्ही या दिवाळीत त्वचेला ताजेतवाने, चमकदार आणि निरोगी ठेवायची इच्छा बाळगता, तर आजपासूनच खालील पाच सोप्या टिप्स फॉलो करा.चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी बाजारातील महागड्या क्रिम्स वापरण्यापेक्षा तुम्ही घरगुती उपाय करू शकता. चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी जास्त खर्च करण्याची काहीच गरज नाही. यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते आणि नैसर्गिक ग्लो टिकतो. (Skin Care Tips For Diwali)
1. पुरेसे पाणी प्या
स्वस्थ आणि चमकदार त्वचेसाठी शरीरातील हायड्रेशन खूप आवश्यक आहे. दिवसातून कमीतकमी 8-10 ग्लास पाणी प्या. पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघतात आणि त्वचा आतून नमी टिकवते. नारळाचे पाणी, ग्रीन टी आणि फळांचा रस यांचा देखील समावेश आहारात करता येतो. तेलकट, तुपकट, गोड पदार्थ खाल्ल्यामुळे आळस येतो. बऱ्याचदा शरीर थोडं फुगल्यासारखंही वाटतं. हे टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या. शरीर डिटॉक्स होण्यासही मदत होईल.
2. योग्य स्किनकेअर रुटीन
दिवाळीत बहुतेक लोक मेकअप करतात, त्यामुळे दिवाळीपूर्वी रोज मॉइस्चरायझर वापरणं महत्त्वाचं आहे. झोपण्याआधी चेहरा नीट साफ करा. फेस पॅकसुद्धा वापरू शकता. यामुळे मृत त्वचेच्या पेशी दूर होतात आणि त्वचा अधिक चमकदार दिसते. दिवाळीपूर्वीची साफसफाई आणि वातावरणातील प्रदूषणामुळे त्वचेवर मळ आणि तेल जमा होते. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे.
3. हेल्दी डायटचा वापर करा
आहाराचा थेट परिणाम त्वचेवर होतो. तळलेले, जास्त मसालेदार पदार्थ टाळा आणि त्याऐवजी फळं, हिरव्या भाजीपाला आणि नट्सला प्राधान्य द्या. व्हिटॅमिन C आणि E ने समृद्ध अन्न त्वचेला मजबूती आणि नैसर्गिक चमक देते.
4. पुरेशी झोप घ्या
झोपेची कमतरता त्वचेला थकीत आणि डल बनवते. रोज किमान 7-8 तास झोप घ्या. झोपेत त्वचा स्वतःला रिपेअर करते आणि नवीन पेशी तयार करते.
5. घरच्या घरी फेस पॅक बनवा
सणाच्या काळात घरच्या घरी सहज फेस पॅक बनवता येतो. दूध आणि हळदीचा, किंवा दही व बेसनाचा फेस पॅक वापरा. यामुळे त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळतो. हलक्या हातांनी चेहऱ्याची मसाज केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा अधिक चमकदार होते.या सोप्या उपायांनी तुम्ही दिवाळीत त्वचेला ताजेतवाने आणि सुंदर ठेवू शकता
























