एक्स्प्लोर
Advertisement
Diwali 2023 : देवी लक्ष्मीची कृपा होण्यासाठी करा 'हे' उपाय, धनलाभ होईल
Diwali 2023 : दिवाळीमध्ये साफसफाई आणि सजावटीला फार महत्त्व आहे. वास्तू शास्त्रानुसार घर कसं सजवायचं, जाणून घ्या.
Diwali 2023 : दिवाळीत (Diwali 2023) लक्ष्मी देवीला (Laxmi Pujan) प्रसन्न करण्यासाठी दिवे लावण्याची, मिठाई आणि भेटवस्तू वाटण्याची आणि लक्ष्मीपूजन करण्याची प्रथा आहे. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक पूजा करतात, पण पूजा करताना ते अनेक नियम विसरतात. फक्त पूजा केल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होत नाही, यासाठी आणखी काय करावे लागेल? ते जाणून घ्या.
दिवाळीमध्ये साफसफाई आणि सजावटीला फार महत्त्व आहे. दिवाळीमध्ये घर आणि ऑफिसची साफसफाई करून सुंदर रोषणाई आणि आरास करतात. यामुळे प्रसन्न वातावरण निर्माण होते आणि अशा ठिकाणी माता लक्ष्मी नांदते, तेथे सुख-समृद्धी नांदते.
वास्तू शास्त्रानुसार घर कसं सजवायचं?
- दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर, घरात सकारात्मक ऊर्जा पसरवण्यासाठी आणि सुख, सौभाग्य आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी अशा प्रकारे आपले घर सजवा.
- दिवाळीच्या दिवशी मुख्य दरवाजाच्या आजूबाजूची जागा पूर्णपणे स्वच्छ करा आणि दरवाजासमोर स्वस्तिक चिकटवा. हे नकारात्मक ऊर्जा रोखण्यासाठी उपयुक्त आहे.
- स्वस्तिकासोबतच मुख्य गेटवर अष्ट मंगला चिन्ह लावायला विसरू नका.
- मुख्य दरवाजासमोर किंवा घरासमोरील जवळील रिकाम्या जागेवर रांगोळी काढा. रांगोळीसाठी विशेषतः रॉक मीठ वापरा. यामुळे मुख्य दरवाजातून नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करू शकणार नाही.
- लक्ष्मी आणि गणपतीच्या प्रतिकृती मुख्य दरवाजाच्या वर किंवा आजूबाजूला चिकटवाव्यात.
- मुख्य दरवाजाच्या चौकटीवर मातीचे दिवे ठेवा आणि रांगोळीवर दिवे लावायला विसरू नका.
- देवी लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत आहे अशा प्रकारे, मुख्य दरवाजापासून पुजेच्या खोलीपर्यंत पावलांचे ठसे उमटवा.
- मुख्य प्रवेशद्वारावर झेंडूची फुले आणि आंब्याच्या पानांनी बनवलेली तोरण लावा.
- गुलाबाच्या पाकळ्या पाण्याने भरलेल्या भांड्यात दिवे ठेवा, हे मुख्य प्रवेशद्वाराजवळ पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवा. असे केल्याने समृद्धी वाढते.
- दिवाळीत पणती लावण्यासाठी शुद्ध तूप वापरावं.
- प्रत्येक दिव्याला चार वाती असाव्यात. एक वात लक्ष्मीजीची, दुसरी श्री गणेशाची, तिसरी कुबेरची आणि चौथी इंद्रदेवाची.
- शुद्ध तुपाचे किमान पाच दिवे लावावेत. एक दिवा स्वयंपाकघरात, दुसरा बेडरूममध्ये, तिसरा दिवाणखान्यात आणि चौथा वॉशरूममध्ये.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Diwali 2023 : वास्तू शास्त्रानुसार देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे उपाय, दिवाळीची साफसफाई कशी कराल?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement