Christmas 2024: ख्रिसमसच्या आधी बेबी Jesus ची मूर्ती चोरली, मग चोराने केले 'असे' काही, तुम्ही सुद्धा व्हाल थक्क! व्हायरल पोस्ट
Christmas 2024: जिथे संपूर्ण जग ख्रिसमसच्या तयारीत तसेच आनंदाचा प्रसंग साजरा करण्यासाठी व्यस्त होते. तर दुसरीकडे एक विचित्र घटना समोर आली. जाणून घ्या..
Christmas 2024 Viral Post: आज नाताळ म्हणजे ख्रिसमसचा सण आहे. मात्र याच्या काही दिवसांपूर्वी अमेरिकेत अशी घटना घडली, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. जिथे संपूर्ण जग ख्रिसमसच्या तयारीत तसेच आनंदाचा प्रसंग साजरा करण्यासाठी व्यस्त होते. तर दुसरीकडे एक विचित्र घटना समोर आली. अलीकडेच, अमेरिकेतील कोलोरॅडो या ठिकाणी चोरीला गेलेला बेबी येशूचा पुतळा जवळच्या अग्निशमन केंद्रात अज्ञातपणे सोडण्यात आला होता. विचित्र गोष्ट म्हणजे मूर्ती परत करणाऱ्या व्यक्तीने मूर्तीसोबत एक सॉरी नोटही सोडली. त्याबद्दल जाणून घेऊया
मूर्ती चोरीला गेली कशी?
या प्रकरणाबद्दल सांगायचं म्हणजे, काही दिवसांपूर्वीच जन्मस्थळावरून बेबी येशूची मूर्ती चोरीला गेली होती. यानंतर सॉरी नोटसह ती स्वतः परतही केली. चोरीनंतर फोर्ट कॉलिन्स पोलीस विभागाने फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. त्यात एका लहान मुलाने हातात पुतळा धरल्याचे अस्पष्ट चित्र होते. हे छायाचित्र सीसीटिव्ही कॅमेऱ्याने टिपले आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहलंय की, ओल्ड टाऊन स्क्वेअर येथील जन्माच्या देखाव्यातून बेबी येशूची मूर्ती चोरून ख्रिसमस खराब करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही या संशयिताला ओळखत असल्यास, कृपया ऑफिसर ब्रिटिंगहॅमला सूचित करा. चोरीनंतर फोर्ट कॉलिन्स पोलीस विभागाने फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. ती पोस्ट आम्ही इथे शेअर करत आहोत.
चोराने स्वतः मूर्ती परत केली
मात्र, घटनेच्या काही दिवसांनंतर पोलिसांनी हे प्रकरण बंद केले आणि मूर्ती जप्त झाल्याची माहिती त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये दिली. फोर्ट कॉलिन्स येथील पावडर फायर अथॉरिटी स्टेशनमध्ये बेबी जीझसची मूर्ती सापडल्याचे त्यांनी सांगितले. या पोस्टमध्ये एक चित्र देखील आहे, ज्यामध्ये दोन फायरमन हातात मूर्ती धरलेले दिसत आहेत. यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे बेबी येशूच्या चेहऱ्यावर एक माफीनामा पत्र चिकटवण्यात आले होते, ज्यामध्ये, ''मला खरोखर माफ करा'' असे लिहिले होते. ''यावेळी मी एक मूर्ख चूक केली. हे पुन्हा होणार नाही'' या चोरीमागे कोणाचा हात होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
हेही वाचा>>>
Viral: अजबच! ऑफिसमध्ये Swiggy वरून मागवला कंडोम? मग 'असं' काही घडलं की.., पोस्ट झाली व्हायरल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )