Health Tips : वयाच्या चाळीशीतही चेहऱ्यावर ग्लो हवाय? फक्त पाणी पिण्याचे 'हे' 5 नियम फॉलो करा
Drinking Water Rules : पाणी पिण्याची योग्य पद्धत तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करते. यामुळे तुमची त्वचा तजेलदार राहते.
Drinking Water Rules : पाण्याचा आपल्या आरोग्याशी अगदी खोलवर संबंध आहे. पाणी केवळ आपल्याला निरोगी ठेवत नाही तर त्वचेला ग्लो आणि सुंदरही बनवते. भरपूर पाणी प्यायल्यामुळे तुमचे वय त्वचेवर आणि चेहऱ्यावर दिसत नाही. भरपूर पाणी प्यायल्याने चेहऱ्याचा तजेलदारपणा कायम राहतो, असे अनेकवेळा तुम्ही ऐकले असेल. तुम्हालाही वयाच्या 40 व्या वर्षीही पंचविशीचा ग्लो हवा असेल आणि कायम तरूण राहायचे असेल तर तुम्हाला पाणी पिण्याची योग्य पद्धत माहित असणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला पाणी पिण्याचे असे 5 नियम सांगणार आहोत, ज्याचे पालन केल्यास तुमचे वय कमी दिसेल आणि तुमचा चेहरा तजेलदार दिसेल.
पाणी पिण्याचे 5 नियम
1. जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नका. जेवल्यानंतर अर्ध्या तासानंतरच पाणी प्या. जर तुम्ही अन्न खाल्ले असेल आणि काही प्यायचे असेल तर तुम्ही दूध, दही पिऊ शकता.
2. एका झटक्यात पाणी कधीही पिऊ नका. म्हणजे एकाच वेळी भरपूर पाणी पिऊ नये. पाणी घोटाघोटाने आरामात प्यावे. हे पोटाच्या आरोग्यासाठी चांगले असते.
3. थंड पाणी पिणे टाळावे - अनेकदा आपल्याला भरपूर तहान लागल्यावर थंड पाणी शोधत असतो. पण हे चुकीचे आहे. उन्हाळ्यात मातीच्या भांड्यातील पाणी पिणे केव्हाही चांगले आहे. आणि इतर ऋतूत साधे पाणी प्यावे.
4. सकाळी फ्रेश झाल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यायल्यावरच नाश्ता करावा. किंवा आधी चहा प्यावा. यामुळे शरीरात साचलेले टॉक्सिन्स बाहेर पडतात.
5. अनेकदा लोक उभे राहून पाणी पिण्यास सुरुवात करतात, ही पद्धत अजिबात योग्य नाही तसेच आरोग्यासाठीही चांगली नाही. त्यामुळे उभे राहून कधीही पाणी पिऊ नये.
जर तुम्ही पाणी पिण्याच्या या सवयी फॉलो केल्या तर तुम्हाला काही दिवसांतच त्वचेवर तसेच शरीरावर फरक जाणवेल. तसेच, तुम्हाला इतर कोणत्याही समस्या जाणवणार नाहीत. यासाठी निरोगी शरीर जर हवं असेल, किंवा वयाच्या चाळीशीतही तुम्हाला तारूण्यासारखा ग्लो हवा असेल तर भरपूर पाणी प्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :