9th May 2022 Important Events : 9th May 2022 Important Events : मे महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. मे महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 9 मे चे दिनविशेष.
1502 : ख्रिस्तोफर कोलंबस, ज्याला जगातील सर्वात महान अन्वेषक आणि नवीन जगाचा शोधक मानले जाते, आशियाचा मार्ग शोधण्यासाठी स्पेनमधील कॅडीझ येथून चौथ्या प्रवासाला सुरुवात केली.
1653 : जगप्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू आणि जगातील आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालचे बांधकाम 22 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर पूर्ण झाले.
1866 : भारतीय स्वातंत्र्यसेनानी, मराठी समाजसुधारक गोपाळ कृष्ण गोखले यांजा जन्म.
गोपाळ कृष्ण गोखले हे भारतामधील ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणाऱ्या राजकीय आणि सामाजिक नेत्यांपैकी एक होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आघाडीचे नेते आणि भारत सेवक समाज या संस्थेचे ते संस्थापक होते.
1928 : समाजवादी कामगार नेते वसंत नीलकंठ गुप्ते यांचा जन्म.
वसंत नीलकंठ गुप्ते हे मराठी समाजवादी कामगार नेते, लेखक आणि समाजवादाचे अभ्यासक होते. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या जीनिव्हा येथील अधिवेशनात त्यांनी लागोपाठ तीन वेळा भारतीय कामगारांच्या शिष्टमंडळात प्रतिनिधित्व केले. हिंद मजदूर सभेचेही ते काही काळ राष्ट्रीय सचिव होते. हिंद मजदूर सभेच्या पुढाकाराने कामगार चळवळीच्या संशोधनार्थ स्थापलेल्या मणिबेन कारा लेबर इन्स्टिट्यूट या संस्थेचे ते स्थापनेपासून संचालक होते. कामगार चळवळीच्या अनुषंगाने त्यांनी मराठी आणि इंग्लिश भाषांतून ग्रंथ, निबंध लिहिले.
1955 : पश्चिम जर्मनी देशाचा नाटो (NATO)मधे प्रवेश.
पश्चिम जर्मनी नाटोचा सदस्य झाला आणि फ्रान्समधील नाटोच्या मुख्यालयावर जर्मन ध्वज फडकविण्यात आला.
1959 पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भाऊराव पाटील यांचे निधन.
भाऊराव पाटील हे महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. 'स्वावलंबनाने कष्ट करून शिका' हा त्यांचा मंत्र होता. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. भाऊरावांनी मागास आणि गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा आणि शिका' ही योजना सुरू करून मोठे काम केले. ते जोतीराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. भाऊराव पाटील यांना 1959 साली त्यांच्या कार्याबद्दल 'पद्मभूषण' हा पुरस्कार मिळाला.
1975 : पहिले इलेक्ट्रिक टायपिंग मशीन बनविले.
महत्वाच्या बातम्या :