8th May 2022 Important Events : मे महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. मे महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 8 मे चे दिनविशेष.


8 मे : जागतिक मातृदिन.


8 मे 1914 रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी एक कायदा संमत करून घेतला. या कायद्यानुसार, मे महिन्याचा दुसरा रविवार 'मदर्स डे' म्हणून साजरा करण्यात येतो. तेव्हापासून बहुतांश देशांमध्ये मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी 'मदर्स डे' साजरा केला जाऊ लागला. भारतामध्येही मदर्स डे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या दिवशी आईला कामात मदत करून, तिला वेगवेगळ्या भेटवस्तू देऊन खुश केले जाते. 


1864 : आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस चळवळीची स्थापना करण्यात आली.


8 ते 22 ऑगस्ट 1864 च्या दरम्यान जिनीव्हा येथे एका राजकीय परिषदेत पहिले जिनीव्हा युद्धसंकेत निश्चित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस क्रिसेंट चळवळीचे संस्थापक हेन्री ड्युनंट यांच्या सन्मानार्थ जागतिक रेड क्रॉस रेड डे 8 मे रोजी साजरा केला जातो. 


1933 :  महात्मा गांधी यांनी अस्पृश्यता विरूद्ध 21 दिवसांचे उपोषण करण्यास बसले.


भारताच्या राजकीय स्वयंनिर्णयाच्या हक्काचा प्रश्न चांगल्या रीतीने सोडविण्याकरिता इंग्‍लंडमध्ये नोव्हेंबर 1931 मध्ये भारतीय प्रतिनिधींची गोलमेज परिषद भरली. हिंदू, मुसलमान, स्पृश्य आणि अस्पृश्य यांना विभक्त मतदार संघ द्यावे की नाही याबद्दल तेथे हिंदी प्रतिनिधींमध्ये मतभेद झाले. अशा प्रकारची जातीयता स्वराज्यात राहू नये, त्याकरिता प्राण गेले तरी चालतील, असे गांधींनी त्या परिषदेत निकराने जाहीर केले. 18 ऑगस्ट 1932 रोजी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी डॉ. भी. रा. ऊर्फ बाबासाहेब आंबेडकरांच्या आग्रहावरून अस्पृश्यांना विभक्त मतदारसंघ दिल्याचे जाहीर केले. हे ऐकल्यानंतर गांधींनी 20 सप्‍टेंबर रोजी या प्रश्नावर प्राणांतिक उपोषण सुरू केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी त्यांनी वाटाघाटी केल्या. तारीख 26 रोजी गांधींचा जीव वाचविण्याकरिता डॉ. आंबेडकरांनी तडजोड केली आणि येरवडा करार झाला. 8 मे 1933 पासून त्यांनी 21 दिवसांचे उपोषण सुरू केले. 


1906 : भारतीय लष्करी दलाचे चौथे सेना प्रमुख जनरल प्राणनाथ थापर यांचा जन्मदिन.


प्राणनाथ थापर हे भारताचे माजी भूसेनाप्रमुख होते. लाहोर येथील सरकारी महाविद्यालयात त्यांचे शिक्षण झाले. इंग्‍लंडमधील शाही सैनिकी महाविद्यालयात लष्करी शिक्षण झाल्यावर 1926 मध्ये पहिल्या पंजाब रेजिमेंटमध्ये ते राजादिष्ट अधिकारी म्हणून नियुक्त झाले. सेनाप्रमुख कार्यालयात साहाय्यक सैनिकी चिटणीस आणि सेनापुनर्घटना समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. 


1929 : भारतीय शास्त्रीय गायिका गिरीजा देवी यांचा जन्मदिन.


इ.स. 1929 साली भारतीय पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण तसेच हिंदुस्थानी संगीत क्षेत्रांत दिला जाणारा संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित बनारस घराण्याच्या भारतीय शास्त्रीय गायिका गिरीजा देवी यांचा जन्मदिन. त्यांनी गायिलेला ठुमरी या शास्त्रीय संगीत प्रकारासाठी त्या विशेष ओळखल्या जातात.


1982 : आत्माराम रावजी देशपांडे यांचे निधन.


आत्माराम रावजी देशपांडे हे कवी अनिल या टोपन नावाने लेखन करणारे एक मराठी भाषेतील ज्येष्ठ कवी होते. मुक्तछंदातील काव्यप्रकाराचे प्रवर्तक असणारे कवी अनिल यांनी दहा चरणांची कविता सर्वप्रथम सुरू केली. सन 1982 साली भारतातील महाराष्ट्र राज्यातील विदर्भीय मराठी भाषिक कवी आणि साहित्यकार आत्माराम रावजी देशपांडे यांचे निधन झाले.


महत्वाच्या बातम्या :