5th May 2022 Important Events : मे महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. मे महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 5 मे चे दिनविशेष.
1818 : महान विचारवंत, इतिहासकार आणि प्रसिद्ध जर्मन अर्थशास्त्रज्ञ कार्ल मार्क्स यांचा जन्म.
मार्क्स, कार्ल हे 19 व्या शतकातील एक जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ होते. 1918 साली झालेल्या रशियातील साम्यवादी क्रांतीच्या आणि 1949 मध्ये चीनमध्ये झालेल्या साम्यवादी क्रांतीच्या तत्त्वज्ञानाचे मूळ प्रणेते होते. फ्रेडरिक एन्जेल्स (Friedrich Engels) प्रमाणे मार्क्सने देखील तत्कालिन राजकीय लढ्यांमध्ये भाग घेतला. कार्ल मार्क्स यांनी "दास कॅपिटाल" या ग्रंथाचा पहिला खंड इ.स. 1867 मध्ये प्रसिद्ध केला. कार्ल मार्क्स यांच्या विचारांची लोकप्रियता सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर कमी झाली असली तरी ते विचार शिक्षण क्षेत्र, राजकीय क्षेत्र, कामगार लढा यामध्ये अजूनही लोकप्रिय आहेत. मार्क्स यांचे विचार अनेक कम्युनिस्ट राज्ये आणि राजकीय चळवळींमध्ये अजूनही आदर्श मानले जातात.
1906 : शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांचा जन्म.
डॉ. आप्पासाहेब गणपतराव पवार हे महाराष्ट्रातील एक शिक्षणतज्ज्ञ होते. मुरब्बी प्रशासक, मराठ्यांच्या इतिहासाचे संशोधक आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू अशी त्यांची ओळख आहे. महाराष्ट्र राज्याचे ते पहिले शिक्षण संचालक होते.
1916 : भारताचे माजी राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांचा जन्म.
ग्यानी झैल सिंग हे भारतीय प्रजासत्ताकाचे अकरावे राष्ट्रपती आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील काँग्रेसचे एक निष्ठावान कार्यकर्ते होते.
1918 : त्र्यंबक बापूजी ठोमरे उर्फ बालकवी तथा निसर्गकवी यांचे निधन.
त्र्यंबक बापूजी ठोमरे उर्फ बालकवी एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी. पूर्ण नाव त्र्यंबक बापूजी ठोमरे. जळगाव येथे भरलेल्या पहिल्या मराठी कविसंमेलनात (1907) त्यांनी केलेल्या काव्यवाचनामुळे प्रभावित होऊन संमेलनाध्यक्ष कान्होबा रणछोडदास कीर्तिकर ह्यांनी त्यांना ‘बालकवी’ हे नाव देऊन त्यांचा गौरव केला. त्यानंतर लवकरच मराठीतील श्रेष्ठ कवी म्हणून त्यांचा लौकिक झाला ‘बालकवी’ हे नावही रूढ झाले.
1984 : फु दोरजी हे ऑक्सिजनशिवाय माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले भारतीय ठरले.
2010 : सर्वोच्च न्यायालयाने संशयित गुन्हेगारांवरील नार्को विश्लेषण, ब्रेन मॅपिंग किंवा पॉलीग्राफ चाचण्यांसारखे तपास नाकारले आणि याला वैयक्तिक स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन म्हटले.
2017 : इस्रोने दक्षिण आशिया उपग्रह अवकाशात यशस्वीपणे सोडला.
महत्वाच्या बातम्या :