Bank Jobs : निवृत्त कर्मचाऱ्यांना चांगली संधी; परीक्षेशिवाय बँकेत नोकरी, पगारही चांगला, असा करा अर्ज
Government Jobs : निवृत्त असलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरी करण्याची संधी स्टेट बँक ऑफ इंडियाने उपलब्ध करून दिली आहे.
Jobs In Bank : निवृत्तीनंतरही काम करण्याचा उत्साह असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 'स्टेट बँक ऑफ इंडिया'ने रिझोल्व्हरच्या पदासाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 1 नोव्हेंबरपासून सुरू असून उमेदवार 21 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 94 रिक्त पदे भरली जातील. अधिकृत अधिसूचना पूर्णपणे वाचल्यानंतर उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. तुम्हाला फक्त ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
पात्रता निकष काय?
जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, SBI मधून निवृत्त अधिकारी देखील या पदांसाठी अर्ज करू शकतात. संबंधित क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार जारी केलेले भरतीबाबतची अधिसूचना पाहावी.
परीक्षेशिवाय भरती...
या पदांवर निवडलेल्या उमेदवारांची निवड परीक्षा न करता केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीत 100 गुणांचे प्रश्न विचारले जातील. अंतिम निवड गुणवत्तेद्वारे केली जाईल.
SBI Recruitment Notification 2023 या लिंकवर इच्छुक उमेदवार अधिक माहिती पाहू शकतात.
असा करा अर्ज
- इच्छुक उमेदवारांनी सर्वात आधी sbi.co. या वेबसाईटवर लॉगिन करावे.
- त्यानंतर होमपेजवर carees या टॅबवर क्लिक करावे.
- Current Openings या पर्यायावर क्लिक करावे.
- RECRUITMENT OF PROBATIONARY OFFICERS या पर्यायावर क्लिक करा.
- या ठिकाणी नोंदणीवर क्लिक करा आणि तुमची नोंदणी करा.
- अर्ज भरल्यानंतर तुमचे शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे अपलोड करावीत.
>> पगार किती मिळणार?
सेवानिवृत्त अधिकाऱ्याला ग्रेडनुसार पगार मिळेल. मिडल मॅनेजमेंट ग्रेड स्केल-2 आणि 3 (एमएमजीएस 2) साठी, पगार 40,000 रुपये असेल. (एमएमजीएस ग्रेड 4) यांना 45,000 रुपये पगार दिला जाईल.
नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये मोठी भरती
करन्सी नोट प्रेस (Currency Note Press) नाशिकमध्ये (Nashik) अनेक पदांसाठी भरती जारी करण्यात आली आहे. यामार्फत 117 पदांवर भरती केली जाईल. करन्सी नोट प्रेस नाशिकनं जारी केलेल्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर आहे. जर तुम्ही या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल, तर नोट प्रेसची अधिकृत वेबसाईट cnpnashik.spmcil.com जाऊन अर्ज करु शकता.
भरतीसंदर्भात महत्त्वाची माहिती
19 ऑक्टोबर रोजी भरती प्रक्रियेसाठी अर्ज मागविण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तुम्हाला या भरती प्रक्रियेअंतर्गत जारी करण्यात आलेल्या पदांसाठी अर्ज 18 नोव्हेंबरपूर्वी करावा लागेल, असं नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलं आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेला कोणताही अर्ज उशिरा दंड भरल्यानंतरही स्वीकारला जाणार नाही, असंही अधिसूचनेत स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे.
किती पदांची भरती?
करन्सी नोट प्रेस नाशिक भरती प्रक्रियेअंतर्गत 117 पदांवर भरती केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला cnpnashik.spmcil.com वर जावं लागेल. या भरतीद्वारे पर्यवेक्षकाच्या 3 पदं, कलाकार 1 पदं, सचिवालय सहाय्यक 1 पदं आणि कनिष्ठ तंत्रज्ञ 112 पदांवर भरती केली जाणार आहे.