SBI Recruitment 2022 : नोकरीच्या शोधात असाल आणि बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर ही संधी गमावू नका. सध्या स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर (Managers) आणि डेप्युटी मॅनेजर (Deputy Managers) या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2022 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार SBI ची अधिकृत वेबसाइट bank.sbi/web/careers वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 21 मे 2022 पासून सुरु झाली आहे.
1. पोस्टचे नाव : मॅनेजर Manager ( IT Security Expert)
शैक्षणिक पात्रता : बीई/ बीटेक इन (संगणक विज्ञान/ संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/ माहिती तंत्रज्ञान/सॉफ्टवेअर अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण अभियांत्रिकी) किंवा संबंधित विषयातील समतुल्य पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठ किमान 60% गुणांसह
अनुभव : किमान 8 वर्षांचा आयटी क्षेत्रामध्ये किंवा बिझनेसमध्ये काम करण्याचा अनुभव.
2. पोस्टचे नाव : डेप्युटी मॅनेजर Deputy Manager (Network Engineer)
शैक्षणिक पात्रता : बीई/ बीटेक इन (संगणक विज्ञान/ संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/ माहिती तंत्रज्ञान/सॉफ्टवेअर अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण अभियांत्रिकी) किंवा संबंधित विषयातील समतुल्य पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठ किमान 60% गुणांसह
अनुभव : किमान 5 वर्षांचा आयटी क्षेत्रामध्ये किंवा बिझनेसमध्ये काम करण्याचा अनुभव.
निवड प्रक्रिया
या पदांसाठी उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल, जी केवळ मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार केली जाईल.
महत्वाच्या बातम्या :
- SBI Recruitment 2022 : एसबीआयमध्ये 60 वर्षांवरील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना नोकरीची संधी, थेट मुलाखतीतून होणार निवड
- IAF Recruitment 2022 : भारतीय वायूदलात नोकरी करण्यास इच्छुक आहात? अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या
- OIL Recruitment 2022 : एलपीजी ऑपरेटर पदांसाठी बंपर भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड, संधी गमावू नका, लगेच अर्ज करा