UGC NET 2021, 2022 : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) ने राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET 2021, 2022) म्हणजेच NET परीक्षा (UGC NET नोंदणी) साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. डिसेंबर 2021 आणि जून 2022 या दोन्ही महिन्यांच्या परीक्षांसाठी या तारखा वाढवण्यात आल्या आहेत. यावेळी डिसेंबर 2021 ची परीक्षा जून 2022 च्या परीक्षेत विलीन करण्यात आली आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय


कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अर्जाची तारीख पुढे ढकलण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत, उमेदवार आता नवीन तारखेपर्यंत दोन्ही परीक्षांसाठी (UGC NET डिसेंबर 2021, जून 2022 नोंदणी) अर्ज करू शकतात. UGC NET परीक्षेसाठी अर्ज करण्याची आणि अर्ज फी भरण्याची नवीन अंतिम तारीख 30 मे 2022 आहे.



या वेबसाइटवरून अर्ज करा -


UGC NET परीक्षा 2021 आणि 2022 (UGC NET 2021, 2022 Registrations Last Date) साठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला UGC NET च्या अधिकृत वेबसाइटवर ugcnet.nta.nic.in जावे लागेल. 


यूजीसी अध्यक्षांनी ट्विट करून दिली माहिती


याबाबतची अधिकृत घोषणा UGC चेअरमन यांनी त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून ट्विट करून दिली. "UGC-NET डिसेंबर 2021 आणि जून 2022 ऑनलाइन अर्ज सादर करण्याबाबत उमेदवारांच्या विनंतीनुसार, अर्ज सादर करण्याची आणि फी भरण्याची अंतिम तारीख 30 मे 2022 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."


NTA ची Application Correction Window


आधीच्या योजनेनुसार, NTA म्हणजेच राष्ट्रीय चाचणी एजन्सीने डिसेंबर आणि जूनच्या विलीन केलेल्या प्रकियेसाठी अर्ज सुधारणा विंडो (Application Correction Window) उघडली होती. आज 23 मे 2022 ही बदल करण्याची शेवटची तारीख होती. मात्र, त्यानंतरच शेवटची तारीख वाढविल्याची माहिती समोर आली. नेट परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते, मात्र यावेळी डिसेंबरची परीक्षा महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.


 


 


 


 


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI