OIL Recruitment 2022 : Oil India Limited ने LPG ऑपरेटर आणि इतर पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार OIL ची अधिकृत वेबसाइट oil-india.com द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेअंतर्गत, LPG ऑपरेटर आणि इतर पदांसाठी 16 पदं भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी 24 मे, 25 मे आणि 27 मे 2022 रोजी मुलाखत होणार आहे.


किती जागा रिक्त?



  • संविदा नर्सिंग ट्यूटर : 1 पद

  • कंत्राटी वॉर्डन (महिला) : 2 पदं

  • कंत्राटी एलपीजी ऑपरेटर : 8 पदं

  • कंत्राटी आयटी सहाय्यक : 5 पदं


निवड प्रक्रिया


उमेदवारांची निवड प्रात्यक्षिक/कौशल्य चाचणी आणि वैयक्तिक मूल्यांकनाद्वारे केली जाईल. वॉक-इन-प्रॅक्टिकल/कौशल्य चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना किमान 50 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.


शैक्षणिक पात्रता


संविदा नर्सिंग ट्यूटरसाठी अर्ज करणारे उमेदवार B.Sc उत्तीर्ण असावेत. संविदा वॉर्डन (महिला) बीएससी पास आणि होम सायन्स किंवा हाउसकीपिंगमध्ये डिप्लोमा या पदांसाठी. 
कंत्राटी एलपीजी ऑपरेटर : शासन मान्यताप्राप्त पॉलिटेक्निकमधून 03 (तीन) वर्षांचा मेकॅनिकल/ केमिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंग विषयातील डिप्लोमा आवश्यक. 


वेतनश्रेणी 



  • कंत्राटी नर्सिंग ट्यूटर : 19,500 रुपये.

  • कंत्राटी वॉर्डन (महिला) : 19,500 रुपये.

  • कंत्राटी एलपीजी ऑपरेटर : 19,500 रुपये. 

  • कंत्राटी आयटी सहाय्यक : 16,640 रुपये. 


महत्त्वाचं  


मुलाखतीला जाणाऱ्या उमेदवारांना कोरोना लसीकरणाचं प्रमाणपत्र किंवा रॅपिड अँटीजेन टेस्ट (RAT) अहवाल दाखवावा लागेल. तसं न करणाऱ्या उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही. 


अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :