Indian Air Force LDC Recruitment 2022 : भारतीय वायूदलानं हवाई दल सामायिक प्रवेश परीक्षा (AFCAT - 02/2022) 2022 ची अधिसूचना जारी केली आहे. या परीक्षेद्वारे भारतीय वायूदलातील फ्लाइंग ब्रान्च आणि ग्राउंड ड्युटी (टेक्निकल आणि नॉन टेक्निकल) मध्ये भरती केली जाईल. याशिवाय हवामानशास्त्र शाखेत (मेटेरोलॉजी ब्रान्च) हवामानशास्त्र प्रवेशासाठी आणि फ्लाईंग ब्रान्चमध्ये एनसीसी विशेष प्रवेशासाठी भरती होणार आहे. अर्ज प्रक्रिया 1 जून 2022 पासून सुरू होईल आणि 30 जूनपर्यंत चालेल. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार careerindianairforce.cdac.in किंवा afcat.cdac.in वर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
महत्वाची तारखा
ऑनलाइन नोंदणीची सुरुवात : 01 जून 2022
ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख : 30 जून 2022
शैक्षणिक पात्रता
या भरती मोहिमेत विविध पदांसाठी उमेदवारांना विविध शैक्षणिक पात्रता विचारण्यात आली आहे. उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेच्या अधिक तपशीलांसाठी अधिकृत अधिसूचना तपासण्याचा सल्ला दिला जातो.
निवड प्रक्रिया
- AFCAT लेखी परीक्षा
- अधिकारी बुद्धिमत्ता रेटिंग चाचणी आणि चित्र धारणा आणि चर्चा चाचणी, मानसशास्त्रीय चाचणी
- गट चाचणी / मुलाखत
कसा करायचा अर्ज?
- afcat.cdac.in येथे AFCAT च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- मुख्यपृष्ठावरील "उमेदवार लॉगिन" वर क्लिक करा.
- येथे आपली नोंदणी करा.
- अर्जावर क्लिक करा.
- अर्ज फी भरा.
महत्त्वाची माहिती
उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती म्हणजे, अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जावं आणि अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण तपशील तपासावा, जेणेकरून वयाची पात्रता, परीक्षा इत्यादींचे संपूर्ण तपशील मिळू शकतील.
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :