SBI Recruitment 2022 : स्टेट बँक ऑफ इंडियाने सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी भरती काढली आहे. बँकेत अनेक पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत 641 पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर, चॅनल मॅनेजर सुपरवायझर आणि एनी टाईम चॅनेलसह इतर पदांवर भरती केली जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेच्या https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 जून 2022 आहे.


अर्ज सुरू करण्याची तारीख : 18 मे 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जून 2022


या भरतीद्वारे एकूण 641 पदे भरली जातील. त्यापैकी 503 पदे चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर एनी टाईम चॅनल, 130 पदे चॅनल मॅनेजर सुपरवायझर एनी टाइम चॅनल आणि 8 पदे सपोर्ट ऑफिसरसाठी आहेत.


पगाराचा तपशील  
चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटरच्या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना 36,000 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल. चॅनल मॅनेजर पर्यवेक्षक पदासाठी उमेदवारांना 41,000 रूपये दरमहा आणि सपोर्ट ऑफिसर उमेदवारांना दरमहा 41,000 रुपये वेतन दिले जाईल.


शैक्षणिक पात्रता  
या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार हा बँकेचा सेवानिवृत्त कर्मचारी असावा. यासोबतच त्याच्याकडे स्मार्ट फोन असावा. अधिकारी/कर्मचाऱ्याने वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतरच बँकेच्या सेवेतून निवृत्त व्हायला हवे.


निवड कशी केली जाईल ?
शॉर्टलिस्टिंग, मुलाखत आणि गुणवत्ता यादीच्या आधारे या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल.


महत्वाच्या बातम्या


Job Majha : सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात भरती सुरू; असा करा अर्ज


IAF Recruitment 2022 : भारतीय वायूदलात नोकरी करण्यास इच्छुक आहात? अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या


OIL Recruitment 2022 : एलपीजी ऑपरेटर पदांसाठी बंपर भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड, संधी गमावू नका, लगेच अर्ज करा