एक्स्प्लोर

सरकारी नोकरीची मोठी संधी, पगार मिळणार 85 हजार, कसा कराल अर्ज, काय आहे पात्रता? 

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियात (SBI) भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) या पदांसाठी भरती सुरु आहे.

Govt job 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियात (SBI) भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) च्या 169 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. सरकारी बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 डिसेंबर 2024 

या भरती प्रक्रियेअंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक अभियंता यांच्यासह विविध पदांवर नियुक्त्या करण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 डिसेंबर 2024 निश्चित करण्यात आली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

आवश्यक पात्रता काय? किती मिळणार पगार?

SBI च्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी संबंधित ट्रेडमधील अभियांत्रिकी पदवी आवश्यक आहे. यासोबतच उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील अनुभव असणं गरजेचं आहे. या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराचे किमान वय 21 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना 48,480 रुपये ते 85,920 रुपये प्रति महिना वेतन मिळणार आहे. याशिवाय बँकेकडून इतर भत्ते आणि फायदेही दिले जाणार आहेत

22 नोव्हेंबरपासून अर्ज करण्याची प्रकिया सुरु

या रिक्त पदासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 22 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 12 डिसेंबर 2024 असणार आहे. अर्ज फी जमा करण्याची अंतिम तारीख ही 12 डिसेंबर 2024 आहे. अर्ज करण्यासाठी, प्रथम SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जा. त्यानंतर होमपेजवरील “करंट व्हेकन्सीज” या लिंकवर क्लिक करा. आता उमेदवारांनी संबंधित लिंकवर क्लिक करून फॉर्म भरा आणि सबमिट करावा. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे, त्यांनी 12 डिसेंबरपूर्वी अर्ज करणं गरजेचं आहे.

युवकांसाठी मोठी संधी

दरम्यान, ज्या युवकांना सध्या नोकरीची गरज आहे किंवा ते युवक सरकारी नोकरी शोधत आहेत, अशांसाठी ही मोठी संधी आहे. विशेष म्हणजे  स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर या पदावर संबंधित उमेदवारांची निवड झाल्यावर त्यांना पगार देखील चांगला मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार उमेदवारांना महिना 85 हजार रुपयांचा पगार दिला जाणार आहे. तसेच वेगवेगळे भत्ते दिले जाणार आहेत. त्यामुळं या संधीचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 

महत्वाच्या बातम्या:

बँकेत नोकरी हवीय का? 1500 पदांसाठी भरती प्रकिया सुरु, अर्ज करण्यासाठी उरले शेवटचे काही तास

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Fake Medicines : बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
Pune Fire: पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खास; अग्निशमन घटनास्थळी दाखल
पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खास; अग्निशमन घटनास्थळी दाखल
रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report BJP MNS : पाठिंब्याच्या बदल्यात भाजप मनसेला कोणतं गिफ्ट देणार?Special Report Vidhansabha Adhiveshan :  विरोधकांची टशन, अधिवेशनाची सुरुवात विरोधकांच्या सभात्यागानंSharad Pawar PC : ममता बॅनर्जींमध्ये 'इंडिया'चं नेतृत्व करण्याची क्षमता,पवारांचं मोठ वक्तव्यJob Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात नोकरीची संधी, अटी काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Fake Medicines : बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
Pune Fire: पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खास; अग्निशमन घटनास्थळी दाखल
पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खास; अग्निशमन घटनास्थळी दाखल
रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
Video: बँक मॅनेजर अन् खातेदारामध्ये एकच फाईट, वातावरण टाईट; व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स सुस्साट
Video: बँक मॅनेजर अन् खातेदारामध्ये एकच फाईट, वातावरण टाईट; व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स सुस्साट
Mohammed Shami : दुसऱ्या कसोटीत संकटात असलेल्या भारतासाठी दिलासा, मोहम्मद शमीबाबत मोठी अपडेट
मोठी बातमी, दुसऱ्या कसोटीत भारत पराभवाच्या छायेत असताना नवी अपडेट, मोहम्मद शमी कमबॅक करणार?
Stock SIP vs Mutual Fund SIP: स्टॉक एसआयपी की म्यूच्यूअल फंडमधील गुंतवणूक फायद्याची, चांगला परतावा कशातून मिळतो?
स्टॉक एसआयपी की म्यूच्यूअल फंडमधील गुंतवणूक फायद्याची, चांगला परतावा कशातून मिळतो?
Embed widget