Recruitment 2022 : ठाणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या संपूर्ण तपशील
Recruitment 2022 : सिंधुदुर्ग सार्वजनिक आरोग्य विभाग आणि ठाणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती होत आहे. या भरतीसाठी दहावीपासून पदवीपर्यंतचे विद्यार्थी अर्ज करू शकतात.
Recruitment 2022 : ठाणे महानगरपालिका आणि सिंधुदुर्ग सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांसाठी भरती होत आहे. या भरतीसाठी दहावीपासून पदवीपर्यंतचे विद्यार्थी अर्ज करू शकतात. ठाणे महानगरपालिकेतील पदांसाठी 14 जून रोजी मुलाखत होणार आहे. तर सिंधुदुर्ग सार्वजनिक आरोग्य विभागातील भरीसाठी अर्ज करू इच्छिणारे 8 जून पर्यंत आपला अर्ज करू शकतात.
ठाणे महानगरपालिका
पहिली पोस्ट : अटेंडंट / Attendant
शैक्षणिक पात्रता : दहावी पास, शासकीय/निमशासकीय रुग्णालयात शवविच्छेदन विभागात काम केल्याचा अनुभवाला प्राधान्य. शासकीय/निमशासकीय अथवा नामांकित संस्थेमध्ये अटेंडट म्हणून काम केल्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य, मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक.
एकूण जागा : 24
वयोमर्यादा : 38 वर्षांपर्यंत
मुलाखतीचं ठिकाण : राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, ठाणे
मुलाखतीची तारीख : 14 जून 2022
तपशील : www.thanecity.gov.in
दुसरी पोस्ट : कनिष्ठ तंत्रज्ञ (प्रयोगशाळा)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापिठाची रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र या विषयातील पदवी उत्तीर्ण, शासन मान्य संस्थेची पी.जी. डी.एम.एल.टी कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) पदवीस प्राधान्य, शासकीय/निमशासकीय अथवा नामांकित संस्थेमध्ये ज्युनियर टेक्निशियन म्हणून काम केल्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव.
एकूण जागा : 19
वयोमर्यादा : 38 वर्षांपर्यंत
मुलाखतीचं ठिकाण : राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, ठाणे
मुलाखतीची तारीख : 14 जून 2022
तपशील : www.thanecity.gov.in
तिसरी पोस्ट : कनिष्ठ तंत्रज्ञ (रेडिओलॉजी)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापिठाची बॅचलर इन रेडिओलॉजी(बी.एम.आर.टी) पदवी आवश्यक, शासकीय/निमशासकीय अथवा नामांकित संस्थेमध्ये रेडिओलॉजी विभागात तंत्रज्ञ म्हणून काम केल्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य, महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील अधिकृत MS-CIT किंवा DOEEACC सोसायटी अधिकृत CCC किंवा O/A/B/C स्तर पैकी कोणतीही परीक्षा उत्तीर्ण, मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक.
एकूण जागा : 04
वयोमर्यादा : 38 वर्षांपर्यंत
मुलाखतीचं ठिकाण : राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, ठाणे
मुलाखतीची तारीख : 14 जून 2022
तपशील : www.thanecity.gov.in
चौथी पोस्ट : ई.सी.जी. तंत्रज्ञ / E.C.G. Technician
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापिठाची भौतिकशास्त्र विषयांसह विज्ञान शाखेची पदवी आवश्यक, शासकीय निमशासकीय अथवा नामांकित संस्थेमध्ये ई.सी.जी.टेक्निशियन म्हणून काम केल्याचा किमान ३ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य
एकूण जागा : 01
वयोमर्यादा : 38 वर्षांपर्यंत
मुलाखतीचं ठिकाण : राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, ठाणे
मुलाखतीची तारीख : 14 जून 2022
तपशील : www.thanecity.gov.in
पाचवी पोस्ट : एक्सरे तंत्रज्ञ
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापिठाची बॅचलर इन रेडिओलॉजी(बी.एम.आर.टी) पदवी आवश्यक, शासकीय निमशासकीय अथवा नामांकित संस्थेमध्ये क्ष-किरण तंत्रज्ञ म्हणून काम केल्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य, मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक
एकूण जागा : 06
वयोमर्यादा : 38 वर्षांपर्यंत
नोकरीचं ठिकाण : ठाणे
मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.
मुलाखतीचं ठिकाण : राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा, ठाणे
मुलाखतीची तारीख : 14 जून 2022
तपशील : www.thanecity.gov.in
सार्वजनिक आरोग्य विभाग, सिंधुदुर्ग
पोस्ट : वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, पुरुष आरोग्य सेवक
शैक्षणिक पात्रता : वैद्यकीय अधिकारी पदासाठी MBBS, स्टाफ नर्ससाठी GNM/ B.Sc नर्सिंग, लॅब टेक्निशियनसाठी १२वी पास, DMLT किंवा M.Sc / B.Sc in Micro, पुरुष आरोग्य सेवक पदासाठी विज्ञान शाखेतून १२वी पास, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स
एकूण जागा : 37
अर्ज पाठवण्याचा पत्ता : सीआरयू कक्ष, पोस्ट विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 जून 2022
तपशील : sindhudurg.nic.in (या वेबसाईटवर गेल्यावर notices मध्ये recruitment वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.