NTRO मध्ये IT प्रोफेशनल्सच्या पदांसाठी रिक्त जागा; झटपट अर्ज करा, संधी सोडू नका
NTRO Recruitment 2022 : या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा किमान 30 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा 62 वर्षांच्या दरम्यान असावी.
NTRO Recruitment 2022 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी. नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन (NTRO) ने आयटी प्रोफेशनल्स/इंजिनीअर्स सल्लागार पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 नोव्हेंबर 2022 आहे आणि अर्ज प्रक्रिया 19 ऑक्टोबर 2022 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 123 रिक्त पदं काढण्यात आली आहेत.
एनटीआरओ भरतीसंदर्भातील महत्त्वाची माहिती
एकूण पदांची संख्या : 123
सायबर सिक्योरिटी अॅनालिस्ट : 36
सॉफ्टवेयर प्रोग्रामर : 4
रिस्क अॅनालिस्ट : 10
नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर : 2
पावर अँड एनर्जी सेक्टर आयटी अँड ओटी सिक्योरिटी कंसल्टेंट : 3
बीएसएफआय सेक्टर आयटी सिक्योरिटी कंसल्टंट : 3
क्लाउड इन्फ्रॉस्ट्रक्चर सिक्योरिटी कंसल्टंट : 1
डाटा एसेंशियल : सेंटर सिक्योरिटी कंसल्टंट : 2
सीनियर सॉफ्टवेयर इंजीनिअर : 2
टीम लीडर : 2
सिस्टम स्पेशलिस्ट : 3
कंसल्टंट : 33
मोबाईल सिक्योरिटी रिसर्चर : 2
सायबर सिक्योरिटी रिसर्चर : 5
फर्मवेयर रिसर्व इंजीनियर : 1
सॉफ्टवेयर डेवलपर : 1
रिमोट सेंसिंग डेटा : 2
सिस्टम स्पेशलिस्ट : 1
सीनियर सॉफ्टवेयर इंजीनियर : 2
नेटवर्क इंजीनियर : 1
जियोस्पेक्टिकल सॉफ्टवेयर इंजीनियर : 2
एआय/आयव्हीआय कंसल्टेंट : 5
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची किमान वयोमर्यादा 30 वर्ष आणि कमाल वयोमर्यादा 62 वर्ष असावी.
कशी होणार निवड?
शैक्षणिक पात्रता, कौशल्य चाचणी आणि अनुभवाच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल.
अर्ज कसा कराल?
या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार ntro.gov.in वर 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
उमेदवारांनी संबंधित विषयात BE/B.Tech/MTech/MCA केलेलं असावं. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेसह इतर पॅरामीटर्सच्या तपशीलांसाठी, एनटीआरओ भर्ती 2022 अधिसूचना पहा.
अर्ज करण्यासाठी खालीली स्टेप्स फॉलो करा.
सर्वात आधी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
तिथे "CLICK HERE TO APPLY ONLINE" या लिंकवर क्लिक करा.
त्यानंतर नोंदणी करा.
फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरा आणि सबमिट करा.
भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून स्वतःजवळ ठेवा.
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
FSSAI मध्ये दहावी-बारावी आणि पदवीधरांसाठी रिक्त जागा, प्रतिमाह 2 लाखांहून अधिक वेतन मिळवण्याची संधी