NPCIL Recruitment 2022 : ITI पास उमेदवारांसाठी नामी संधी; काहीच दिवस बाकी, झटपट अर्ज करा
NPCIL Recruitment 2022 : न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडनं ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवले आहेत. काहीच दिवस शिल्लक, लवकर अर्ज करा.
NPCIL Recruitment 2022 : न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडनं ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ट्रेड अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी फक्त 4 दिवस उरले आहेत. ज्या उमेदवारांनी अद्याप या पदांसाठी अर्ज केलेला नाही ते अधिकृत वेबसाइट npcilcareers.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै 2022 आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 177 रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता
न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडनं जारी केलेल्या भरतीमध्ये जाहीर केलेल्या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार संबंधित ट्रेडमधील आयटीआय पदवीसह दहावी उत्तीर्ण असावेत.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असणारे उमेदवारांचं वय 14 ते 24 वर्षे दरम्यान असावं. तसेच, उच्च वयोमर्यादेत अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्ष आणि ओबीसी प्रवर्गासाठी तीन वर्षांची सूट देण्यात आली आहे.
अर्ज प्रक्रिया
शैक्षणिक पात्रतेच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्तेच्या आधारावर अर्जदारांची निवड केली जाईल. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जारी केलेली अधिसूचना तपासू शकतात.
कसा कराल अर्ज?
सर्वात आधी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट npcilcareers.co.in ला भेट द्यावी.
होम पेजवर देण्यात आलेल्या Career सेक्शनवर क्लिक करा.
आता संबंधित पदांसाठी Apply लिंकवर क्लिक करा.
आवश्यक कागदपत्र अपलोड करा.
आता सबमिट बटणावर क्लिक करा.
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :