एक्स्प्लोर

Job Majha : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खूशखबर! आगामी तीन महिन्यात उपलब्ध होणार रोजगाराच्या अनेक संधी 

Recruitment 2022 : देशात विविध क्षेत्रात लवकरच मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. टीम लीज कंपनीने केलेल्या सर्व्हे मधून याबाबत माहिती मिळाली आहे.

Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. देशात विविध क्षेत्रात लवकरच मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. देशातील सुप्रसिद्ध कर्मचारी आणि एचआर तंत्रज्ञान कंपनी टीम लीजच्या अहवालात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. या कंपनीने भारतात अनेक क्षेत्रात नोकऱ्या  उपलब्ध होणार असल्याचा दावा केला आहे. कंपनीचे सीईओ सुमित सभरवाल यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

"टीम लीज ही कंपनी दर तीन महिन्याला एक सर्व्हे करत असते. या सर्व्हेमध्ये येणाऱ्या तीन महिन्यांमध्ये देशातील रोजगाराची स्थिती काय असेल याचा आढावा घेते. आगामी तीन महिन्यात कोणत्या-कोणत्या क्षेत्रात रोजगार उपलब्ध होणार आहे, याबाबत कंपनी सर्व्हे करते. कंपनीने 22 राज्यांमधून इनपूट मागविले आहेत. यात कंपनीकडून 14 ते 15 क्षेत्रांवर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले आहे. टीम लीज ही कंपनी एंट्री लेव्हल ते टॉप लेव्हल पर्यंत कोणत्या-कोणत्या क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध होतील याबाबतचा सर्व्हे करते, अशी माहिती सुमित सभरवाल यांनी दिली. 

सुमित सभरवाल यांनी सांगितले की, टीम लीज कंपनीने यावेळी केलेल्या सर्व्हेतून कॉर्पोरेट क्षेत्रात जास्त सकारात्मक स्थिती असल्याची माहिती मिळाली आहे. कोरोना महामारीच्या परिस्थितीमुळे गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक कंपन्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कपात केली होती. परंतु, आगामी काळात याच कंपन्या मोठ्या प्रमाणात नोकर भरती करणार आहेत. 

कोणत्या क्षेत्रात जास्त संधी? 
आगामी तीन महिन्यात ई- कॉमर्स, टेक्नोलॉजी, शैक्षणिक क्षेत्रात रोजगाराच्या चांगल्या संधी निर्माण होतील. बंगळूरू, चैन्नई, हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली सारख्या शहरात रोजगाराच्या संधी निर्णाम होतील, असे सुमित सभरवाल म्हणाले.  

महत्वाच्या बातम्या

Job Majha : इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची संधी, 766 जगांसाठी निघाली भरती 

ITBP SI Recruitment 2022 : दहावी पास उमेदवारांना ITBPमध्ये नोकरीची संधी, या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

महत्त्वाच्या बातम्या

गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त

नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Embed widget