NHB Recruitment 2023 : बँकेत नोकरीची संधी! 1 लाख 29 हजार पगार; येथे दाखल करा अर्ज
National Housing Bank Jobs : राष्ट्रीय गृहनिर्माण बँक (NHB) भरती सुरु आहे. या भरतीसाठी 23 ते 55 वयोगटातील उमेदवार अर्ज दाखल करु शकतात.
National Housing Bank Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेने (NHB) भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरती अंतर्गत राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेतील (National Housing Bank) विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवार nhb.org.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज दाखल करु शकतात. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज दाखल करावेत अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2023 आहे. उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज दाखल करावा.
NHB Recruitment 2023 : रिक्त पदांचा तपशील
या भरती अंतर्गत राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेतील (National Housing Bank) महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, प्रादेशिक व्यवस्थापक, व्यवस्थापक अशा एकूण 36 पदांची भरती केली जाणार आहे.
NHB Recruitment 2023 : शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी विविध शैक्षणिक पात्रता निकष आहेत. पदानुसार उमेदवारांनी पदवी / अभियांत्रिकी पदवी / CA/ MCA / MBA / PG पदवी / एमफिल / पीएचडी किंवा समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा. याबाबत अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना पाहावी.
NHB Recruitment 2023 : पगार किती मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदानुसार 48,170 रुपये ते 1,29,000 रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.
NHB Recruitment 2023 : वयोमर्यादा
अधिसूचनेनुसार, या भरतीअंतर्गत दिलेल्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 23 ते 55 वर्षे दरम्यान असावे.
NHB Recruitment 2023 : अर्जाची फी
राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेतील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. या भरतीसाठी अर्ज करणार्या सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी 850 रुपये शुल्क भरावे लागेल, तर SC/ST/PWD उमेदवारांसाठी 175 रुपये शुल्क भरावे लागेल.
NHB Recruitment 2023 : कशी असेल निवड प्रक्रिया?
राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेतील भरतीसाठी शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
NHB Recruitment 2023 : असा करा अर्ज
या भरतीसाठी इच्छुक उमेदवार nhb.org.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज दाखल करु शकतात. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 6 फेब्रुवारी 2023 आहे. या तारखेपर्यंत दाखल केलेले अर्ज भरतीसाठी ग्राह्य धरले जातील. शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करु शकतात. भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटची मदत घेऊ शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या
LIC आणि केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्थेमध्ये नोकरीची संधी, असा करा अर्ज