(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIC HFL Recruitment 2022 : पदवीधरांना LIC मध्ये नोकरीची संधी, येथे करा अर्ज, वाचा सविस्तर...
LIC HFL Recruitment 2022 : पदवीधरांना LIC मध्ये नोकरीची संधी आहे. या पदांवरील भरती लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटवर अर्ज करु शकतात.
LIC HFL Recruitment 2022 : तुम्ही पदवीधर असून नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. पदवीधर उमेदवारांना जीवन विमा निगममध्ये (LIC) नोकरीची संधी आहे. यासाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटवर अर्ज करु शकतात. LIC च्या या भरती अंतर्गत 80 पदांवर भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 04 ऑगस्ट 2022 पासून सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी lichousing.com या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2022 आहे. त्यामुळे उमेदवारांना शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करावा.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज प्रक्रिया सुरु झाल्याची तारीख : 04 ऑगस्ट 2022
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 25 ऑगस्ट 2022
रिक्त पदांचा तपशील
या भरती अंतर्गत एकूण 80 पदांवर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये असिस्टंट आणि असिस्टंट मॅनेजर या पदांवर भरती करण्यात येईल.
शैक्षणिक पात्रता
या भरतीअंतर्गत असिस्टंट पदासाठी अर्ज करणार उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापिठातून 55 टक्के गुणांसह पदवी शिक्षण पूर्ण केलेल असावं. तर असिस्टंट मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापिठातून 60 टक्के गुणांसह पदवीधर असावे.
पगाराचा तपशील
असिस्टंट पदावर निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 22 हजार 730 रुपये वेतन दिले जाईल. तर असिस्टंट मॅनेजरपदावर निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 53 हजार 620 रुपये वेतन दिले जाईल.
कशी असेल निवड प्रक्रिया? जाणून घ्या
या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. ही परीक्षा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे.
अर्ज फी
या भरतीअंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 800 रु अर्ज फी भरावी लागेल.
अर्ज कसा कराल?
स्टेप 1 : सर्वप्रथम ibpsonline.ibps.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
स्टेप 2 : असिस्टंट/असिस्टंट मॅनेजर भरतीसाठीच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3 : नोंदणीसाठीच्या पर्यायावर क्लिक करा.
स्टेप 4 : योग्य माहिती भरा.
स्टेप 5 : सर्व माहिती आणि अर्ज शुल्क भरल्यानंतर, फॉर्म सबमिट करा.
स्टेप 6 : तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही फॉर्मची प्रिंटआउट घेऊ शकता.