Job Majha : माझगाव डॉक शिप बिल्डर्स, जिल्हाधिकारी कार्यालय, KDMC मध्ये नोकरीची संधी, आजच करा अर्ज
Job Majha : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी आणि इतरही ठिकाणी नोकरीची उत्तम संधी आहे. जाणून घ्या
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू असून नोकरीची सुवर्णसंधी आहे. वेळ न दवडता जाणून घ्या
मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मध्ये नोकरीची संधी
पोस्ट - नॉन एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरती होत आहे. (एसी रेफ्रिजरेशन मेकॅनिक, कंप्रेसर अटेंडंट, ब्रास फिनिशर, कारपेंटर, चिपर ग्राइंडर, कंपोझिट वेल्डर, डिझेल क्रेन ऑपरेटर, डिझेल कम मोटर मेकॅनिक, ड्रायव्हर, इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, गॅस कटर, मेकॅनिक, मिलिंग मशीन, मशीनी, मशीन पाईप फिटर, स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर, युटिलिटी हँड, हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर, कनिष्ठ ड्राफ्ट्समन, पॅरामेडिक्स, फार्मासिस्ट, प्लॅनर एस्टिमेटर, रिगर, सेफ्टी इन्स्पेक्टर, स्टोअर्स कीपर, मरीन इन्सुलेटर, सेल मेकर, सिक्युरिटी सिपाही, लॉन्च डेक क्रू, इंजिन ड्रायव्हर/2रा वर्ग इंजिन ड्रायव्हर, लायसन्स टू एक्ट इंजिनिअर, मास्टर IST क्लास).
शैक्षणिक पात्रता - 10 वी पास, डिप्लोमा, डिग्री, इंजिनिअरिंग, ITI (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)
एकूण जागा - 1 हजार 41
वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष
नोकरीचं ठिकाण - मुंबई
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर 2022
तपशील - mazagondock.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers मध्ये careers - non executives यावर क्लिक करा. 9 सप्टेंबरला जाहीर झालेल्या जाहिरातीच्य़ा लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
-----------------------------------------------------------------------------------------------------
राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे
पोस्ट - वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, ANM, लॅब टेक्निशियन
एकूण जागा - 91
शैक्षणिक पात्रता - वैद्यकीय अधिकारी पदासाठी MBBS, स्टाफ नर्ससाठी B.Sc नर्सिंग/ GNM, फार्मासिस्टसाठी B.Pharm/ D.Pharm, ANM साठी 10वी पास, ANM कोर्स उत्तीर्ण, लॅब टेक्निशिय़नसाठी DMLT सब B.Sc.
नोकरीचं ठिकाण - ठाणे
ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज करु शकता.
अर्ज पाठवण्याचा पत्ता - उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, धर्मवीर नगर- 2, ठाणे (प.) 400604
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 16 सप्टेंबर 2022
तपशील - www.zpthane.maharashtra.gov.in
------------------------------------------------------------------------------------------------------
जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी
पोस्ट - विशेष सहाय्यक सरकारी वकील
शैक्षणिक पात्रता - कायद्याची पदवी
एकूण जागा - 22
अर्ज पाठवण्याचा पत्ता - जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी (उपचिटणीस शाखा)
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 19 सप्टेंबर 2022
तपशील - ratnagiri.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment मध्ये तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. view करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
---------------------------------------------------------------------------------------------------
कल्याण डोंबिवली महानगरपालिका
पोस्ट - सेवानिवृत्त अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी/विदयुत)
शैक्षणिक पात्रता - सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील पदवी
एकूण जागा - 13
ऑफलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करु शकता.
अर्ज पाठवण्याचा पत्ता - सामान्य प्रशासन विभाग, दुसरा मजला, कल्याण डोंबोवली महानगरपालिका, शिवाजी चौक, कल्याण (प.)- 421301
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 सप्टेंबर 2022
तपशील - www.kdmc.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर प्रसिद्धिपत्रकात तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)