एक्स्प्लोर
Job Majha : इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थामध्ये मेगा भरती सुरू, असा करा अर्ज
Job Majha : इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे विविध पदांसाठी पदांसाठी भरती सुरू आहे
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी आणि अप्लाईड न्यूट्रिशन, मुंबई
पोस्ट - सहाय्यक व्याख्याता सह सहाय्यक प्रशिक्षक, निम्न विभाग लिपिक, शिक्षक सहयोगी
- शैक्षणिक पात्रता - पदव्युत्त पदवी, MBA, 12 वी पास, टायपिंगचा वेग 40 श.प्र.मि. (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)
- एकूण जागा - 21
- नोकरीचं ठिकाण - मुंबई
- ऑफलाईन पद्धतीने तु्म्हाला अर्ज करायचा आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता - प्रिन्सिपल, हॉटेल मॅनेजमेंट संस्था, केटरिंग टेक्नॉलॉजी अँड अप्लाईड न्यूट्रिशन, वीर सावरकर मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई- 400028
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 नोव्हेंबर 2022
- तपशील - www.ihmctan.edu (या वेबसाईटवर गेल्यावर संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. हिंदी, इंग्रजी दोन्ही भाषेत जाहिरात आहे. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, रत्नागिरी
पोस्ट - यंग प्रोफेशनल-I, यंग प्रोफेशनल-II, प्रशासकीय सहायक
- शैक्षणिक पात्रता - यंग प्रोफेशनल-I, यंग प्रोफेशनल-II साठी पदव्युत्तर पदवी, प्रशासकीय सहायक पदासाठी पदवीधर ही पात्रता हवी.
- एकूण जागा - 09
- वयोमर्यादा - 38 वर्षांपर्यंत
- नोकरीचं ठिकाण - रत्नागिरी
- अर्ज पाठवण्याचा पत्ता - NAHEP – IDP कार्यालय, DBSKKV, दापोली
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 10 नोव्हेंबर 2022
- तपशील - www.dbskkv.org (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment मध्ये read more वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, मुंबई
पोस्ट - गेस्ट फॅकल्टी
- शैक्षणिक पात्रता - डिग्री / डिप्लोमा
- एकूण जागा - 17
- नोकरीचं ठिकाण - मुंबई
- ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 नोव्हेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट - www.nstimumbai.dgt.gov.in
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement