एक्स्प्लोर

ITBP Recruitment 2024 : आयटीबीपीमध्ये चालक पदाची भरती, दहावी उत्तीर्ण असलेल्यांना सुवर्णसंधी, 545 जागा भरणार

ITBP Recruitment 2024 : इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. आयटीबीपीमध्ये 545 जागांवर भरती केली जाणार आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस म्हणजेच आयटीपीबीमध्ये चालक पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे. आयटीबीपी हे भारताच्या निमलष्करी दलांपैकी एक दल आहे.आयटीबीपीमध्ये कॉन्सेटबल चालक पदासाठी  भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. कॉन्स्टेबल चालक पदाच्या 545 जागांवर भरती प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे. 

आयटीपीबीच्या जाहिरातीनुसार 545 जागांपैकी खुल्या प्रवर्गासाठी 209 जागा असतील. तर, अनुसूचित जाती 77,अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 40, ओबीसीसाठी 164 आणि ईडब्ल्यूएससाठी 55 जागा राखीव असतील.एकूण जागांपैकी 10 टक्के जागा माजी सैनिकांसाठी राखीव असतील. आयटीबीपीमधील कॉन्स्टेबल चालक ही पदं सध्या तात्पुरत्या स्वरुपात असून पुढील काळात त्याचं रुपांतर कायमस्वरुपी पदामध्ये होऊ शकते.  चालक पदावर ज्यांची निवड होईल त्यांना 21700-69100 या वेतनश्रेणीनुसार पगार मिळेल. 

शैक्षणिक पात्रता

आयटीबीपीनं निश्चित केलेल्या अटींनुसार भारतातील कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण मंडळातून उमेदवार दहावी उत्तीर्ण असलेलं आवश्यक आहे. उमेदवाराकडे वैध अवजड वाहनं चालवण्याचा परवाना असणं आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराचं वय  21 ते 27 वर्षांदरम्यान असणं आवश्यक आहे. कॉन्स्टेबल चालक पदासाठी अर्ज करणाऱ्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवार असतील त्यांना 100 रुपये भरावे लागतील. तर, माजी सैनिक आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना अर्जाचं शुल्क भरावं लागणार नाही. 

अर्ज कसा करायचा?

पात्र उमेदवारांनी आयटीबीपी कॉन्स्टेबल चालक पदासाठी अर्ज करायचा असल्यास प्रथम जाहिरात वाचणं आवश्यक आहे. आयटीपीबीच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावे लागतील. उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर त्यांची फिजिकल इफिशियन्स टेस्ट, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, लेखी परीक्षा द्यावी लागेल. यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. यानंतर प्रात्याक्षिक परीक्षा होईल. हा टप्पा पार झाल्यानंतर मेडिकल टेस्ट होईल.

आयटीबीपीमधील कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करण्यास सुरुवात 8 ऑक्टोबरला होईल. तर, 6 नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येतील. आयटीबीपीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज सादर करता येतील. कॉन्स्टेबल चालक पदावर निवड झालेल्या उमेदवारांना भारतात आयटीबीपीकडून जिथं नियुक्ती करण्यात येईल तिथं नोकरी करावी लागेल. 

दरम्यान, आयटीबीपीची स्थापना 24 ऑक्टोबर 1962 रोजी करण्यात आली होती. आयटीबीपीकडून लडाखमधील काराकोरम पासून अरुणाचल प्रदेशातील जाचेप या 3488 किमी अंतराच्या भारताच्या सीमेवर सुरक्षा बंदोबस्त ठेवला जातो. आयटीबीपी गेल्या सहा दशकांपासून कार्यरत आहे.

इतर बातम्या : 

FDA Recruitment 2024 : अन्न व औषध प्रशासन विभागात भरती, किती पगार मिळणार? अर्ज कुठे करायचा? जाणून घ्या

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी

व्हिडीओ

Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
Kolhapur : बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आईचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आईचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
Thackeray brothers BMC Election Results 2026: राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
Embed widget