एक्स्प्लोर

ITBP Recruitment 2023 : सरकारी नोकरीची संधी! ITBP मध्ये बंपर भरती; येथे करा अर्ज

ITBP Recruitment 2023 : आयटीबीपीकडून (ITBP) या भरती अंतर्गत 248 पदांवर भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी वेगवेगळे अर्ज करावे लागतील.

ITBP Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. आईटीबीपीमध्ये (ITBP) नोकरी करण्याची (Job News) सुवर्ण संधी आहे. इंडो-तिबेट सीमा पोलीस दलात (Indo-Tibetan Border Police) भरती सुरु आहे. ITBP मध्ये जीडी कॉन्सेबल (GD Constable) आणि असिस्टेंट कमांडंट (Assistant Commandant) या पदांवर भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरती अंतर्गत 248 पदांवर भरती केली जाणार आहे. आयटीबीपीकडून (ITBP) या भरतीसाठी वेगवेगळे अर्ज करावे लागतील. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबरपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर (ITBP Recruitment 2023 Last Date) आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट recruitment.itbpolice.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

ITBP Recruitment 2023 : महत्त्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रिया सुरु झाल्याची तारीख : 10 नोव्हेंबर 2023
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 15 डिसेंबर 2023

कॉन्स्टेबल जीडी (क्रीडा रिक्त जागा)

  • अ‍ॅथलेटिक्स - 42 पदे
  • एक्वाटिक्स - 39 पदे
  • घोडेस्वार - 8 पदे
  • नेमबाजी - 35 पदे
  • बॉक्सिंग - 21 पदे
  • फुटबॉल - 19 पदे
  • जिम्नॅस्टिक - 12 पदे
  • हॉकी - 7 पदे
  • वेटलिफ्टिंग - 21 पदे
  • वुशु - 2 पदे
  • कबड्डी - 5 पदे
  • कुस्ती - 6 पदे
  • तिरंदाजी - 11पदे
  • कयाकिंग - 4 पदे

रिक्त जागा तपशील

सहाय्यक कमांडंटच्या भरतीसाठी सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी 2 पदे आणि SC श्रेणीतील उमेदवारांसाठी 2 पदे निश्चित करण्यात आली आहेत. त्याशिवाय इतर मागासवर्गीयांसाठी 2 पदे  रिक्त ठेवण्यात आली आहेत.

अर्ज फी

सामान्य आणि OBC तसेच EWS श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये अर्ज फी भरावी लागेल. अनुसूचित जाती, जमाती, महिला प्रवर्गासाठी सूट असल्याने त्यांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. सहाय्यक कमांडंट पदासाठी अर्ज करणारे उमेदवार जर सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील असतील तर त्यांना अर्ज फी म्हणून 400 रुपये द्यावे लागतील. SC, ST आणि महिला वर्गाला कोणतेही अर्ज शुल्क भरावं लागणार नाही.

पगार किती असेल?

कॉन्स्टेबल पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना लेव्हल-3 अंतर्गत 21,700 रुपये ते 69,100 रुपये पगार मिळेल. असिस्टंट कमांडंट पदासाठी, उमेदवारांना लेव्हल-10 नुसार 56,100 रुपये ते 1,77,500 रुपये पगार दिला जाईल.

अर्ज कसा करावा?

  • अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी आधी recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • अर्ज करण्यापूर्वी, अधिकृत अधिसूचना वाचा.
  • अर्जाशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे स्वाक्षरी, फोटो, आयडी प्रूफ काळजीपूर्वक अपलोड करा.
  • अर्जाची फी भरा.
  • त्यानंतर सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट आउट घ्या.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vasai Jewellers Robbery CCTV : हेल्मेट घालून आले थेट बंदूक काढली, ज्वेलर्स दुकानातील दरोड्याचा थरार!Sakshana Salgar on Santosh Deshmukh:देशमुखांची लेक 12वीत,न्यायासाठी दारोदारी जात रडतेय;वाईट वाटतंय!Beed Santosh Deshmukh Case MCOCA Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणी सर्व आरोपींवर मकोकाSuresh Dhas on MCOCA : अजून बऱ्याच लोकांवर मकोका लागणार...सुरेश धसांचा रोख कुणावर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
Video: माझ्या परीक्षा आहेत, पण मला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतंय; धाराशिवमध्ये संतोष देशमुखांची लेक भावुक
Video: माझ्या परीक्षा आहेत, पण मला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतंय; धाराशिवमध्ये संतोष देशमुखांची लेक भावुक
Mutual Fund : सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढणार
सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये पैसा वाढणार
Manikrao Kokate : भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा! माणिकराव कोकाटेंनी सगळंच काढलं; म्हणाले, 'त्यांनी उघडं लढावं की कपडे...
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा! माणिकराव कोकाटेंनी सगळंच काढलं; म्हणाले, 'त्यांनी उघडं लढावं की कपडे...
Embed widget