एक्स्प्लोर

​Indian Army Recruitment 2023: देशसेवेची संधी, ​भारतीय लष्करात भरती, कसा कराल अर्ज?

​Indian Army SSC Technical Recruitment 2023: भारतीय सैन्यात अभियांत्रिकी पदवीधरांच्या 191 पदांवर भरती जारी करण्यात आलीये.

​Indian Army SSC Technical Recruitment 2023: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी. भारतीय लष्करातील 191 पदं काढण्यात आली आहेत. ज्यासाठी उमेदवार अधिकृत साईट www.joinindianarmy.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी उमेदवार 09 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतात. 

भारतीय लष्करानं जारी केलेल्या भरती मोहिमेद्वारे, भारतीय सैन्यात अभियांत्रिकी पदवीधरांच्या 191 पदांची भरती केली जाईल. ज्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स इत्यादी विषयातील अभियांत्रिकी पदवी आणि इतर विहित पात्रता असणं आवश्यक आहे. 

वयोमर्यादा 

अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं किमान वय 20 वर्ष आणि पदानुसार कमाल वय 27/35 वर्ष निश्चित करण्यात आलं आहे.

कशी होणार निवड? 

भारतीय लष्करानं जारी केलेल्या भरती प्रक्रियेतील पदांवर उमेदवारांच्या निवडीसाठी शॉर्टलिस्टिंग प्रक्रिया / SSB मुलाखत / वैद्यकीय चाचणी आयोजित केली जाईल. एसएसबी मुलाखतीला उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

भरती प्रक्रियेसंदर्भातील महत्त्वाच्या तारखा 

  • अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 11 जानेवारी 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 फेब्रुवारी 2023
  • पोस्टानं अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख : 24 फेब्रुवारी 2023

महत्त्वाची कागदपत्रं 

  • आधार कार्ड
  • कास्ट सर्टिफिकेट
  • लेटेस्ट फोटो
  • ईमेल आयडी, मोबाईल नंबर
  • मार्कशीट

कसा कराल अर्ज? 

अधिकृत वेबसाईटला भेट देऊन उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. याशिवाय, उमेदवार ऑफलाईन पद्धतीनं या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या मोहिमेसाठी उमेदवार 09 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. याशिवाय, उमेदवारांनी अर्ज आणि आवश्यक कागदपत्रं 24 फेब्रुवारी 2023 पर्यंत अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर पाठवणं आवश्यक आहे. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाईटची मदत घेऊ शकतात.

अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

तरुणांनो लक्ष द्या! महाराष्ट्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 25 जानेवारी शेवटची तारीख, लवकर अर्ज करा

महत्त्वाच्या बातम्या

इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांसाठी मोठी गुड न्यूज, ISRO त मिळणार नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
Maharashtra Teacher Recruitment : शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! राज्यात पहिली ते बारावीसाठी तब्बल 30,209 हजार शिक्षकांची भरती, पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार
शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! राज्यात पहिली ते बारावीसाठी तब्बल 30,209 हजार शिक्षकांची भरती, पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget