Indian Army Recruitment 2022 : भारतीय सैन्यात बंपर भरती; दहावी-बारावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी संधी
Indian Army Recruitment 2022 : भारतीय सैन्यात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांड अंतर्गत, जालंधर कॅंटमध्ये गट सी च्या 65 पदांसाठी रिक्त जागा घेण्यात आल्या आहेत.
Indian Army Recruitment 2022 : ज्या उमेदवारांना भारतीय सैन्यात नोकरी करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी. भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांड अंतर्गत, जालंधर कॅंटमध्ये गट सी च्या 65 पदांसाठी रिक्त जागा घेण्यात आल्या आहेत. या रिक्त पदांतर्गत न्हावी, स्वयंपाकी, चौकीदार अशा अनेक पदांची भरती केली जाणार आहे. या पदांसाठी उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावा लागेल. यासाठी उमेदवारांनी जारी केलेल्या जाहिरातीतून अर्ज डाउनलोड करून खाली दिलेल्या विहित पत्त्यावर पाठवावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जून 2022 आहे.
रिक्त जागांचा तपशील
न्हावी : 2 पदं
कूक : 4 पोस्ट
चौकीदार : 11 पदं
सांख्यिकी सहाय्यक : 1 पदं
व्यापारी : 8 पदं
वॉशरमन : 12 पदं
सफाईवाला : 27 पदं
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून दहावी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, त्याला संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असावा. अधिक शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी, उमेदवार दिलेली जाहिरात पाहू शकतात.
वयोमर्यादा
जालंधर कॅंटमधील नागरी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असावं.
निवड प्रक्रिया
लेखी परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. परीक्षा हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये घेतली जाईल. अधिकृत वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड करा आणि या पत्त्यावर पाठवा. पत्ता - कमांडंट, मिलिटरी हॉस्पिटल जालंधर कॅंट, पिनकोड - 144055
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :