CSIR-National Chemical Laboratory Pune : सीएसआयआर-नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे (CSIR-National Chemical Laboratory Pune) ने वैज्ञानिक, वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रधान शास्त्रज्ञ (Scientist, Senior Scientist and Principal Scientist) या पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज प्रक्रिया सुरू असून ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 10 मार्च आहे. अर्जाच्या हार्ड कॉपी मिळवण्याची अंतिम तारीख 21 मार्च आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार CSIR-NCL च्या अधिकृत वेबसाइट recruitment.ncl.res.in वर तपशीलवार सूचना पाहू शकतात.


CSIR-NCL भरती, रिक्त जागांचा तपशील


20 रिक्त पदांपैकी 10 पदं शास्त्रज्ञ पदासाठी आहेत. तर 4 रिक्त पदं वरिष्ठ शास्त्रज्ञ पदासाठी आणि 6 रिक्त पदं प्रधान शास्त्रज्ञ पदासाठी आहेत.


वयोमर्यादा


शास्त्रज्ञ पदांसाठी कमाल वय 32 वर्ष असावं. वरिष्ठ शास्त्रज्ञ पदासाठी कमाल वय 37 वर्ष आणि प्रधान शास्त्रज्ञ पदासाठी कमाल वय 45 वर्ष आहे.


अर्ज शुल्क


इच्छुक उमेदवारांना (Applicants) 100 रुपयांचं अर्ज शुल्क भरावं लागेल. 


CSIR-NCL भरती अर्ज कसा करावा


उमेदवारांनी केवळ अधिकृत वेबसाइट (Official Website) recruitment.ncl.res.in द्वारे ऑनलाइन अर्ज करणं आवश्यक आहे आणि त्यानंतर ऑनलाइन अर्जाची हार्ड कॉपी, सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रं, गुणपत्रिका अनुभव प्रमाणपत्रांच्या स्वयं-साक्षांकित प्रती आणि इतरांसह पाठवावं लागेल. 


इच्छुकांनी आपला अर्ज CSIR - राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, डॉ. होमी भाभा रोड, पुणे - 411008 (महाराष्ट्र) या पत्त्यावर पाठवावा. 


महत्वाची माहिती


अर्ज इतर कोणत्याही स्वरूपात सादर केला असल्यास तो स्वीकारला जाणार नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha