Ponniyin Selvan-1 :  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या रायची (Aishwarya Rai- Bachchan) प्रमुख भूमिका असणारा चित्रपट ‘पोन्नियन सेलवन-1’(Ponniyin Selvan-1) ची रिलीज डेट नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. हा यावर्षी चित्रपट 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच या चित्रपटातील ऐश्वर्याचा लूक देखील रिव्हील झाला आहे. चित्रपटात ऐश्वर्यासोबतच विक्रम, जयम रवी , कार्ती आणि शोभिता धुलिपाला (Shobhita Dulipala) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

  


‘पोन्नियन सेलवन-1’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले असून हा चित्रपट दोन पार्टमध्ये तयार करण्यात येणार आहे. हा चित्रपट कल्कि यांच्या तमिळ कादंबरीवर आधारित असणार आहे. ही कादंबरी  1995 साली काल्कि यांनी लिहिली आहे. या चित्रपटाची लाइका प्रोडक्शन आणि मद्रास टॉकीज यांनी निर्मिती केली आहे. ऐश्वर्यानं या चित्रपटातील तिचा लूक शेअर करूमन कॅप्शनमध्ये लिहिले, 'हे सोनेरी पर्व 30 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.' या चित्रपटामध्ये ऐश्वर्या नंदिनी ही भूमिका साकारणार आहे.






500 कोटी आहे चित्रपटाचे बजेट 
‘पोन्नियन सेलवन-1’  हा चित्रपटल तेललू, तमिळ आणि कन्नड या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. रिपोर्टनुसार,  या चित्रपटाचे बजेट 500 कोटी आहे. मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतातील काही भागांमध्ये या चित्रपटाचे शूटिंग झाले आहे.  


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha