NTPC Jobs 2022 : NTPC Limited ने मायनिंग सिरदार (Mining Sirdar) आणि मायनिंग सिरदार (Mining Overman) या पदांसाठी व्यावसायिकांना नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. भरती मोहिमेअंतर्गत 170 हून अधिक पदं भरायची आहेत. निवडलेल्या उमेदवारांना तीन वर्षांसाठी निश्चित मुदतीच्या आधारावर नियुक्त केलं जाईल. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2022 आहे. इच्छुक उमेदवार अर्ज संबंधित माहितीसाठी NTPC च्या अधिकृत वेबसाइट (Official Website) ntpc.co.in वर भेट देऊ शकतात.


एनटीपीसी भर्ती 2022 रिक्त जागांचा तपशील



  • मायनिंग ओव्हरमॅन 74 पदं

  • खनन सरदार 103 पदं


एनटीपीसी भर्ती 2022 येथे निवड प्रक्रिया 


अधिसूचनेनुसार, उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल. ही परीक्षा रांची, रायपूर आणि भुवनेश्वर येथे घेतली जाईल. 


एनटीपीसी भर्ती 2022 शैक्षणिक पात्रता


मायनिंग ओव्हरमॅन पोस्ट्स : उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून खाण अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा आणि कोळशासाठी DGMS द्वारे जारी केलेल्या CMR अंतर्गत ओव्हरमॅन प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.


मायनिंग सरदार पदं : उमेदवारांनी डीजीएमएसद्वारे कोळशासाठी जारी केलेले सिरदार प्रमाणपत्र आणि सेंट जॉन्स अॅम्ब्युलन्स असोसिएशननं जारी केलेले प्रथमोपचार प्रमाणपत्रासह दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.


वयोमर्यादा 


अधिसुचनेनुसार, या भरतीसाठी उमेदवारांची वयोमर्यादा 57 वर्ष निश्चित करण्यात आली आहे. 


एनटीपीसी भरती 2022 वेतन श्रेणी 


मायनिंग ओवरमॅन : 50,000 रुपये प्रति माह
मायनिंग सिरदार : 40,000 रुपये प्रति माह


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI