Beed Accident News : बीड जिल्हा रुग्णालय परिसरात हुंदके आणि अश्रूमुळे वातावरण सुन्न झालं आहे. कारणंही तसंच आहे. आहेर वडगाववरून तीन मित्र बुलेटवर बसून बीडकडे येत असताना त्यांच्यावर काळानं घाला घातला आहे. तीन जीवलग मित्र एकाच वेळी मृत्यूच्या दाढेत ओढले गेले आहेत. बीडकडे जात असताना सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव जाणाऱ्या बसनं बुलेट वरुन जाणाऱ्या तिघांना जोराची धडक दिली. यात दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला तर एका मित्रानं बीडच्या जिल्हा रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. 


तीन जिवलग तरुण मित्रांचा भीषण अपघात झाल्यानं मित्र आणि नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात एकच गर्दी केली. अचानक तिन्ही मित्रांची झालेल्यांची हे मन सुन्न करणारी होती. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खजाना विहिरीजवळ रात्रीच्या सुमारास घडली.  पारसनाथ मनोहर रोहिटे (वय 22), कृष्णा भारत शेळके (वय 23), अक्षय सुरेश मुळे (वय 22) अशी मयतांची नावं आहेत. हे तिघं बुधवारी रात्री आहेरवडगाव येथून बीडकडे बुलेटवरुन येत होते. यावेळी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर येताच त्यांना समोरुन आलेल्या भरधाव बसनं जोराची धडक दिली. यामध्ये पारसनाथ आणि कृष्णाचा जागीच मृत्यू झाला. तर अक्षयला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान अक्षयचाही मृत्यू झाला. 


औरंगाबाद आगाराची औरंगाबाद-लातूर बस ही बीडहुन लातूरकडे जात होती. अचानक समोरून दुचाकी आल्यानं चालकाचा एसटीवरचा ताबा सुटला यावेळी बसनं दुचाकीला जोराची धडक दिली. यात तिघंही गंभीर जखमी झाले. 


डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न 


धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात बसची बुलेटला इतकी मोठी धडक बसली होती की, या धडकेत पारस नाथ रोहिते आणि कृष्णा शेळके या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. यावेळी अक्षय मुळे हा गंभीर जखमी झाला होता. अक्षयला अपघात स्थळावरून बीडच्या रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. डॉक्टरांनी अक्षयला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण यात त्यांना यश आलं नाही आणि अखेर अक्षयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha