Indian Navy Recruitment 2022 : दरवर्षी मोठ्या संख्येनं विद्यार्थी सरकारी नोकरीसाठी तयारी करतात. अशा परिस्थितीत सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नौदलाच्या वेस्टर्न कमांडने 'गट सी'च्या विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना (Notification) जारी केली आहे. या भरतीची जाहिरात 26 फेब्रुवारी 2022 रोजीच्या एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जारी करण्यात आली होती.


नौदलाच्या वेस्टर्न कमांडने जारी केलेल्या माहितीमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, 'गट क'च्या पदांवर भरतीद्वारे निवडलेल्या उमेदवारांची फायरमन, फार्मासिस्ट आणि पेस्ट कंट्रोल वर्कर या रिक्त पदांवर नियुक्ती केली जाईल. या भरतीमध्ये एकूण रिक्त पदांची संख्या 127 आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी जाहिरात जारी झाल्यापासून 60 दिवसांच्या आत अर्ज करू शकतात, त्यानुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2022 आहे.


या भरतीसाठी रिक्त पदांची संख्या खालीलप्रमाणे आहे :



  • फायरमनच्या रिक्त पदांची संख्या : 120

  • फार्मासिस्टच्या रिक्त पदांची संख्या : 01

  • कीटक नियंत्रण कर्मचार्‍यांच्या रिक्त पदांची संख्या : 06


या भरतीसाठी उमेदवारांची निवड शारीरिक चाचणी, अंतरिम नियुक्ती पत्र आणि कागदपत्रांद्वारे केली जाईल. 'गट सी'च्या रिक्त पदांवर भरतीसाठी अर्जदार किमान दहावी उत्तीर्ण असावेत. इतर आवश्यक पात्रता तपासण्यासाठी, उमेदवार davp.nic.in वर भेट देऊन अधिसूचना पाहू शकतात. या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीनेच अर्ज करावा लागेल.


उमेदवार davp.nic.in वर जाऊन त्यांचा अर्ज डाउनलोड करू शकतात. उमेदवारांनी रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो लावून फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ, हेडक्वॉर्टर वेस्टर्न नेव्हल कमांड, बॅलाड पिअर, टायगर गेट जवळ, मुंबई- 400001 या पत्त्यावर अर्ज पाठवावा.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha