एक्स्प्लोर

BMC Recruitment 2024 : मुंबई महापालिकेत 690 जागांची भरती, 1 लाख 40 हजारांपर्यंत पगाराची संधी

BMC Recruitment 2024 : मुंबई महापालिकेनं विविध पदांसाठी भरती प्रक्रियेसंदर्भातील जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे 690 जागा भरल्या जाणार आहेत.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालयाकडून 690 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेनं कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत), दुय्यम अभियंता(स्थापत्य), दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या चार पदांसाठी भरती प्रक्रियेसंदर्भातील जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे मुंबई महापालिकेत नोकरी करण्याची ज्यांना इच्छा असल्यास मूळ जाहिरात वाचून अर्ज सादर करावेत. 

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाच्या एकूण 250 जागा भरल्या जाणार आहेत. हे पद गट क मध्ये येतं. या पदावर भरती झालेल्या उमेदवाराला 41800-132300 आणि भत्ते या वेतणश्रेणीनुसार वेतन मिळेल. या 250 जागांपैकी  24 जागा अनुसूचित जाती प्रवर्ग, 37 अनुसूचित जमाती प्रवर्ग, विमुक्त जाती प्रवर्गासाठी 8, भटक्या जमाती (ब) साठी 2, भटक्या जमाती(क) प्रवर्ग 5, भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी 4 जगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. विशेष मागास प्रवर्ग 4, ओबीसी 35, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग 25, ईडब्ल्यूएससाठी 22  आणि खुल्या प्रवर्गासाठी 84 जागा आहेत. 
   

कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या पदाच्या एकूण 130 जागा भरल्या जाणार आहेत. हे पद गट क मध्ये येतं. या पदावर भरती झालेल्या उमेदवाराला 41800-132300 आणि भत्ते या वेतणश्रेणीनुसार वेतन मिळेल. या 130 जागांपैकी  12 जागा अनुसूचित जाती प्रवर्ग, 10 अनुसूचित जमाती प्रवर्ग, विमुक्त जाती प्रवर्गासाठी 1, भटक्या जमाती (ब) साठी 3, भटक्या जमाती(क) प्रवर्ग 5, भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी 2 जगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. विशेष मागास प्रवर्ग 2, ओबीसी 20, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग 13, ईडब्ल्यूएससाठी 18  आणि खुल्या प्रवर्गासाठी 44 जागा आहेत. 


दुय्यम अभियंता (स्थापत्य) या पदाच्या एकूण 233 जागा भरल्या जाणार आहेत. हे पद गट ब मध्ये येतं. या पदावर भरती झालेल्या उमेदवाराला 44900-142400 आणि भत्ते या वेतणश्रेणीनुसार वेतन मिळेल. या 233 जागांपैकी  22 जागा अनुसूचित जाती प्रवर्ग, 14 जागा अनुसूचित जमाती प्रवर्ग, विमुक्त जाती प्रवर्गासाठी 4, भटक्या जमाती (ब) साठी 2, भटक्या जमाती(क) प्रवर्ग 8, भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी 6 जगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. विशेष मागास प्रवर्ग 7, ओबीसी 47, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग 23, ईडब्ल्यूएससाठी 23 आणि खुल्या प्रवर्गासाठी 77 जागा आहेत. 


दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या पदाच्या एकूण 77 जागा भरल्या जाणार आहेत. हे पद गट ब मध्ये येतं. या पदावर भरती झालेल्या उमेदवाराला 44900-142400 आणि भत्ते या वेतणश्रेणीनुसार वेतन मिळेल. या 77 जागांपैकी  16 जागा अनुसूचित जाती प्रवर्ग, 4 जागा अनुसूचित जमाती प्रवर्ग, विमुक्त जाती प्रवर्गासाठी 2, भटक्या जमाती (ब) साठी 2, भटक्या जमाती(क) प्रवर्ग 1, भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी 1 जगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.  ओबीसी 10, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग 18, ईडब्ल्यूएससाठी 8 आणि खुल्या प्रवर्गासाठी 25 जागा आहेत. 

अर्ज कधी दाखल करता येणार?

मुंबई महापालिकेतील अभियंता पदासाठी अर्ज सादर करण्यासाठी 11 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर हा कालावधी देण्यात आला आहे. याभरतीसंदर्भातील सविस्तर जाहिरात उमेदवारांना 11 नोव्हेंबरला मुंबई महापालिकेच्या वेबसाईटवर सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होईल. या भरती प्रक्रियेसंर्भातील अधिक माहिती देखील 11 नोव्हेंबरला उपलब्ध होईल. 

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) शैक्षणिक पात्रता? 

मुंबई महापालिकेनं सध्या या पदांसाठी शैक्षणिक पात्रता किंवा अधिक माहिती दिलेली नाही. मात्र, मुंबई महापालिकेच्या वेबसाईटवरील जुन्या पत्रकानुसार कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारानं दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तीन वर्षांची स्थापत्य, कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी,पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगमधील पदविका उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. दहावीच्या परीक्षेत मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेलं असणं आवश्यक आहे. याशिवाय एमएसआयटी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. 

इतर बातम्या :

नोकरीच्या शोधात आहात? समाज कल्याण आयुक्तालयामध्ये काम करण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती

MPSC कडून नगरविकास विभागातील 208 आणि शिक्षण सेवेतील प्राध्यापकांच्या 32 जागांची भरती, आयोगाच्या वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध, जाणून घ्या

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget